Odisha Train Accident  esakal
देश

Balasore Train Tragedy: सिग्नल देण्यात झाली होती चूक, सीबीआयने अटक केलेल्या 'त्या' ७ जणांवर निलंबनाची कारवाई

Balasore Train Tragedy: सीबीआयची मोठी कारवाई, निष्काळजीपणामुळे ७ अधिकारी निलंबित.

सकाळ डिजिटल टीम

CBI investigation in Balasore Train Tragedy: बालासोर ट्रेन दुर्घटनेचा तपास करताना आतापर्यंत ७ रेल्वे अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यांनी काम करताना केलेल्या निष्काळजीपणामुळे तीन ट्रेनचा मोठा अपघात झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय, असे सीबीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

२ जूनला बालासोर जिल्ह्यात बाहनगा बाजार रेल्वे स्टेशनजवळ तीन ट्रेन एकमेकांवर धडकल्या होत्या, ज्यामध्ये २९३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२०० पेक्षा अधिक लोक गंभीरपणे जखमी झाले होते. साऊथ इस्टर्न रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार मिश्रा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जर अधिकारी जागरुक असते तर अपघात टळला असता.

शासकीय कर्मचारी निलंबन २४ तास अटकेत राहिल्यावर होतो निलंबित

सीबीआयने आधी अटक केलेल्या ३ जणांसमवेत एकूण ७ जणांना रेल्वेने निलंबित केले आहे. मिश्रांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितले की, कायद्यानुसार जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला २४ तासांपेक्षा जास्त काळ अटक होते तो निलंबित होतो.(Latest Marathi News)

याआधी, सीबीआयने सिनियर सेक्शन इंजिनियर (सिग्नल) अरुण कुमार महंत, सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर आणि टेक्निशिअन पप्पू कुमार यांनी अटक केली होती. त्यांना आणखी चार दिवस सीबीआयच्या ताब्यात ठेवण्यात आलंय.

त्यांची ५ दिवसांची कोठडी पूर्ण होण्याआधी त्यांना सीबीआय विशेष कोर्टात हजर करण्यातआलं जिकडे त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली.(Latest Marathi News)

याआधी साऊथ ईस्टर्न सर्कलच्या रेल्वे सेफ्टी कमीशनर यांनी केलेल्या तपासणीमध्ये उघड झालं की ,स्टेशन जवळील सिग्नलिंग सर्किटमध्ये झालेल्या चुकांमुळे ही दुर्घटना घडली.

कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीशी झाली होती टक्कर

हावडा जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस २ जूनला दुसऱ्या ट्रॅकवर उभ्या असणाऱ्या मालगाडीला धडक झाली, ज्यामुळे त्या गाडीचे बहुतांश डब्बे पटरीवरुन उतरले. यादरम्यान त्याठिकाणाहून जाणारी बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचे मागील काही डब्बे पलटी झाले, ज्यामुळे हा भीषण अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT