Rs 820-crore IMPS scam in UCO Bank Latest News : यूको बँकेतील 820 कोटी रुपयांच्या आयएमपीएस घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये 67 ठिकाणी छापेमारी केली आहे.
यूको बँकेकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान युको बँकेच्या 41 हजार खातेदारांच्या खात्यात अचानक 820 कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा आरोप आहे. एकीकडे ही रक्कम खात्यांमध्ये जमा होत असताना दुसरीकडे ज्या खात्यांमधून ही रक्कम मुळात ट्रान्सफर करण्यात आली, त्या खात्यांमधून डेबिट झाल्याची नोंद झाली नाही.
कोलकाता आणि मंगलोरसह अनेक शहरांतील १३ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आयएमपीएसच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांत 8.53 लाखांहून अधिक व्यवहार करण्यात आले असून, यामध्ये खासगी बँकांच्या 14,000 खातेदारांपर्यंत आणि युको बँकेच्या खातेदारांच्या 41,000 खात्यांपर्यंत 820 कोटी रुपये पोहोचले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मूळ बँक खात्यातून काढलेल्या रकमेची नोंद झाली नाही आणि अनेक खातेदारांनी अचानक आपल्या खात्यात आलेली ही रक्कम काढली.
सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युको बँकेत काम करणारे दोन सहाय्यक अभियंते आणि बँकेत काम करणाऱ्या इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गेल्या वर्षी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात मोबाइल फोन, लॅपटॉप, कंप्यूटर सिस्टम्स, ईमेल आर्काइव्ह आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले होते.
10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत सात खासगी बँकांच्या 14 हजार खातेदारांकडून आयएमपीएसच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसंबंधीचा निधी ४१ हजार युको बँक खातेदारांच्या खात्यात आयएमपीएस चॅनेलद्वारे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. या गुंतागुंतीच्या नेटवर्कमध्ये 8,53,049 व्यवहारांचा समावेश असून या व्यवहारांची नोंद यूको बँक खातेधारकांच्या रेकॉर्डमध्ये झाली आहे. तर मूळ बँकेने या व्यवहार अपयशी झाल्याची नोंद केलं होतं असा आरोप आहे.
त्यांनी सांगितलं की, असाही आरोप आहे की खातेधारकांनी या स्थितीचा फायदा घेतला आणि वेगवेगळ्या बँकींगच्या माध्यमातून यूको बँकेतील अवैध पैसै काढून घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.