जबलपूर : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमधून अनेक तक्रारी येत असतात. पण या कर विभागात कशा प्रकारे लाचखोरीचे प्रकार चालतात याचं एक उदाहरण समोर आलं आहे.
मध्य प्रदेशातील जबरलपूरमध्ये सेन्ट्रल जीएसटीच्या दोन अधीक्षकांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्यावर एका गुटखा व्यापाऱ्याकडून १ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. (CBI has arrested two Superintendents and three Inspectors of CGST in a bribery case)
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, सीबीआयनं मंगळवारी ही अटकेची कारवाई केली. यामध्ये एका अधीक्षकाला ७ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या बड्या अधिकाऱ्यानं राजस्थानातील एका पान-मसालाच्या व्यापाऱ्याकडून १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. या व्यापाऱ्यानं २५ लाख रुपये या अधिकाऱ्याला दिले होते. त्याचबरोबर सीबीआयनं आणखी एक अधीक्षक आणि तीन इन्स्पेक्टरना देखील अटक केली आहे. (Marathi Tajya Batmya)
माध्यमातील वृत्तानुसार, राजस्थानमधील गुटख्याचे व्यापारी त्रिलोकचंद सेन यांच्याकडून एका प्रकरणात सीजीएसटीचे अधीक्षक कपिल कामले यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्रिलोकचंद यांनी २५ लाख रुपये त्यांना दिले होते. यानंतरही त्रिलोकचंद यांच्याकडून उर्वरित पैशांसाठी त्याच्या मागे लागला होता. (Latest Marathi News)
वारंवार त्याच्याकडून पैशांची मागणी होत असल्यानं त्रिलोकचंद यांनी सीबीआयच्या अधीक्षकाकडं तक्रार केली. यानंतर मंगळवारी त्रिलोकचंद यांनी ७ लाख रुपये दिले. जसं त्रिलोकचंद यांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडे हे पैसे दिले त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. अशा प्रकारे लाच घेताना कार्यालयातच कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.