CBI team attacked 
देश

CBI Team Attacked: पेपरफुटी प्रकरणी तपास करायला गेलेल्या CBI टीमवर बिहारमध्ये हल्ला; 4 जणांना अटक

कार्तिक पुजारी

पाटना- पेपरफुटी प्रकरणी सध्या देशातील वातावरण तापलं आहे. परीक्षांमधील कथित अनियमिततेचा तपास सीबीआय करत आहे. याच प्रकरणी यूनियन ग्रँट कमिशन- नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट (UGC NET) पेपरफुटी प्रकरणी बिहारच्या नवाडा जिल्ह्यात गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. सीबीआयची टीम दिल्लीवरून बिहारच्या नावाडा जिल्ह्यात गेली होती. UGC NET पेपरफुटीचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम राजौली पोलीस स्टेशन हद्दीतील कशीयाधीह गावात पोहोचली. यावेळी स्थानिकांनी खोटे पोलीस असल्याचं समजून सीबीआय टीमवर हल्ला केला, शिवाय टीमचे वाहन देखील फोटले.

स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, गावकऱ्यांना हे खोटे पोलीस असल्याचं वाटलं. याप्रकरणी २०० जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त आठ जणांची नावे समोर आली आहेत. सीबीआय टीम आणि गावकऱ्यांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी आल्यानंतर सीबीआय टीमला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यात आले.

स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी अमरिश राहुल यांनी सांगितलं की, पेपरफुटीचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम कशीयाधीह गावात आली होती. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. सीबीआयच्या टीमध्ये चार अधिकारी आणि एक महिला कॉन्स्टेबल होती. सीबीआय टीम एका आरोपीचा सेलफोन ट्रॅक करत असताना सदर गावात पोहोचली होती. पण, त्यांना फोटे असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सीबीआयने स्थानिक पोलिसांना संपर्क केला होता. गावातून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT