नवी दिल्ली- राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या National Curriculum Framework (NCF) च्या शिफारसीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ Central Board of Secondary Education (CBSE) एक नवा प्रयोग करुन पाहण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ओपन बुक टेस्ट' राबवणार असल्याचं कळतंय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (CBSE suggests open book examinations for students of classes 9 to 12 NCF )
रिपोर्टनुसार, सीबीएसईने काही शाळांना ओपन बुक टेस्टचा प्रयोग करुन पाहण्यास सांगितलं आहे. यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी तर ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि जीवशास्त्र (Biology) या विषयांसाठी हा प्रयोग राबवला जाईल. यामधून काय फलित निघते आणि विद्यार्थ्यांना अशी परीक्षा देण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहिलं जाणार आहे.
विशेष म्हणजे सीबीएसईने यापूर्वी देखील असा प्रयोग केला आहे. २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ओपन बुक टेस्ट' परीक्षा राबवली होती. पण, यावर शैक्षणिक संस्था आणि शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे हा प्रयोग बासणात गुंडाळण्यात आला. पण, पुन्हा एकदा हा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 'ओपन बुक टेस्ट' पद्धतीच्या माध्यमातून काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर परीक्षा घेण्यात येतील. त्यानंतर ठरवलं जाईल की, ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पद्धत राबवायची की नाही. सीबीएसईने यासाठी दिल्ली विद्यापीठाशी देखील बोलणी केल्याचं कळत आहे.
'ओपन बुक टेस्ट'ही पारपंरिक परीक्षा पद्धत सोडून नवा प्रयोग आहे. यामध्ये उच्च कौशल्य आवश्यक असणारी परीक्षा घेतली जाते. परिक्षेतील प्रश्न अवघड असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरुन पुस्तके, स्टडी मटेरियल आणून परीक्षा देण्याची मुभा दिली जाते. यात घोकंपट्टी सोडून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालणा मिळावी अशी अपेक्षा असते. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.