CBSE Term 2 Admit Card 2022 Latest Update sakal
देश

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.. CBSE परिक्षेची हॉल तिकीटं जारी

सीबीएसई बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा टर्म 2 करिता 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सीबीएसई बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा टर्म 2 करिता 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE term 2 चे Admit Cards जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपली हॉल तिकीट्स सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून डाऊनलोड करता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे. (CBSE has released the term 2 admit cards 2022 for Class 10 and Class 12 board exams.)

परीक्षेसाठी नुकतीच सीबीएसई बोर्डाकडून खास नियमावली जारी करण्यात आली आहे. 10वीची परीक्षा 24 मे 2022 दिवशी संपणार तर 12वीचा शेवटचा पेपर 15 जून 2022 दिवशी आहे. देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट वरून Admit Card डाऊनलोड करावं लागणार आहे.

Admit Card डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रक्रिया जाणून घ्या

  • CBSE ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या.

  • होम पेज वर e-PAREEKSHA वर क्लिक करा.

  • आता ओपन झालेल्या नव्या पेज वर 'Admit Card/Centre Material for Examination 2021-2022' option वर क्लिक करा.

  • तुमचा User Id, Password आणि Security Pin टाकून लॉगिन करा.

  • 10वी,12वीची CBSE Term 2 admit card आता तुम्हंला स्क्रिन वर दिसतील.

  • हॉलतिकीट डाउनलोड करा. त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT