देश

Video: गोगामेडींच्या हत्येचा व्हिडिओ आला समोर; बिश्नोईच्या गँगच्या रोहित स्वामीनं घेतली जबाबदारी

मारेकऱ्यांनी त्यांच्या घरात घुसून कशाप्रकारे हे कृत्य घडवून आणलं हे सीसीटीव्हीतून स्पष्टपणे दिसतं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रीय करणी सेनेचे प्रमुख सुखदेवसिंह गोगामेदी यांची आज सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात नवी अपडेट समोर आली असून हत्या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे.

तसेच या हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. बिश्नोई गँगनं त्याला मारण्याची यापूर्वीच धमकी दिली होती. (CCTV Footage of Karni Sena Sukhdev Singh Gogamedi murder is out Rohit Swamy of Bishnoi Gang took responsibility)

बिश्नोई गँगनं घेतली जबाबदारी

रोहित स्वामी या बिश्नोई गँगच्या सदस्यानं हा गोळीबार केल्याची जबाबदारी घेतली आहे. जमिनीच्या प्रकरणात हा रोहित स्वामी राजस्थानात सक्रीय आहे. त्यानेच गोगामेदीची हत्या देखील केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. (Latest Marathi News)

कसा घडला घटनाक्रम?

राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष असलेल्या सुखदेवसिंह गोगामेदी यांना घरी कोणी भेटायला जरी गेलं तरी त्याला चार बंदुकधारी सुरक्षा रक्षकांच्या तपासणीला समारं जावं लागतं. त्यानंतर संबंधित व्यक्तीला घरात प्रवेश दिला जातो. पण तरीही हे मारेकरी बंदुका आणि गावठी कट्टे घरात घेऊन जाण्यात यशस्वी ठरले. म्हणजेच गोगामेदी यांच्या सुरक्षेतच चूक झाल्याचं आता बोललं जात आहे. (Marathi Tajya Batmya)

अचानक अंदाधुंद गोळीबार

करणी सेनेचे कार्यकर्ते असल्याचं या मारेकऱ्यांनी सांगितलं, त्यामुळं गोगामेदी यांनी त्यांना घरात प्रवेश दिला. त्यानंतर दहा ते पंधरा दिवस त्यांनी या लोकांशी चर्चा देखील केली. चर्चेनंतर त्यांनी अचानक बंदुका काढून अंदाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात केली. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सीसीटीव्ही फुटेजनुसार, गोगामेदी हे आपल्या सोफ्यावर बसले होते त्यांच्या बाजुला त्यांचे सहकारी देखील होते. त्याचवेळी बाजुला बसलेले हे मारेकरी चर्चेदरम्यान अचानक उठले आणि त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. यामध्ये गोगामेदी यांचा जागीच मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT