CDS Bipin Rawat Death ANI
देश

CDS Bipin Rawat Death: हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आजचा दिवस सुरक्षा दलांप्रमाणेच अवघ्या देशासाठी मोठा धक्कादायक ठरला. सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांच्यासह पत्नी आणि अन्य अकराजणांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे ‘एमआय-१७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर दुपारी साडेबाराच्या सुमारास तमिळनाडूतील कुन्नूरजवळील घनदाट जंगलामध्ये कोसळले. या भीषण अपघातामध्ये जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य अकराजणांचा मृत्यू झाला रावत यांच्या जाण्याने झुंजार रणसेनानी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होते आहे. (CDS Bipin Rawat Death) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदी मान्यवरांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ज्या निलगिरी जिल्ह्याला लागून असलेल्या कट्टेरी-नानचप्पनत्रम् या भागात हा अपघात घडला तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते, दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. हवाई दलाने या दुर्घटनेची तज्ज्ञांच्या विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. या दुर्घटनेमध्ये मृतदेह होरपळले असून त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येईल. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर सध्या वेलिंग्टनमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. रावत यांचे पार्थिव उद्या (ता.९) रोजी दिल्लीत आणले जाणार असून त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: तेल्हाऱ्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT