New CDS Lt General Anil Chauhan esakal
देश

CDS जनरल अनिल चौहान यांनी पदभार स्वीकारला; म्हणाले, जबाबदारी स्वीकारताना मला..

जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर नऊ महिन्यांहून अधिक काळ हे पद रिक्त होतं.

सकाळ डिजिटल टीम

जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर नऊ महिन्यांहून अधिक काळ हे पद रिक्त होतं.

New CDS Lt General Anil Chauhan : लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) यांनी आज (शुक्रवार) देशाचे नवीन CDS म्हणजेच, मुख्य संरक्षण प्रमुख (Chief Defense Officer) म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळं अनिल चौहान आता देशाचे दुसरे सीडीएस बनले आहेत.

यावेळी जनरल अनिल चौहान यांच्या पत्नी अनुपमा चौहान या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या (Chief of Defense Staff) कार्यालयात उपस्थित होत्या. तत्पूर्वी, अनिल चौहान यांनी आज दिल्लीतील युद्ध स्मारकावर पोहोचून अमर जवान ज्योत आणि युद्ध स्मारक इथं शहीद जवानांना आदरांजली वाहिली. बुधवारी सरकारनं चौहान यांची सीडीएस म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर नऊ महिन्यांहून अधिक काळ हे पद रिक्त होतं.

यादरम्यान सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले, भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च पदाची जबाबदारी स्वीकारताना मला अभिमान वाटत आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या नात्यानं मी तिन्ही संरक्षण दलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आम्ही सर्व आव्हानं आणि अडचणींना एकत्रितपणे तोंड देऊ आणि त्यांना सामोरे जाऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. CDS जनरल चौहान यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, एसएन घोरमाडे आणि नौदलाचे उपप्रमुख एअर मार्शल बीआर कृष्णा यांची भेट घेतली. त्याचवेळी तिन्ही सैन्यानं त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान?

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. 1981 मध्ये भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. लेफ्टनंट जनरल चौहान यांनी 1981 ते 2021 या काळात लष्करात महत्त्वाच्या पदांवर काम केलं. 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ते 31 मे 2021 रोजी लष्कराच्या पूर्व कमांडच्या प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) या पदावरून निवृत्त झाले.

पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल चौहान यांच्या कार्यकाळात ईशान्येकडील भागात दहशतवादात मोठी घट झाली होती. लेफ्टनंट जनरल चौहान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्तम युद्ध सेवा पदक, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT