chandrababu-naidu 
देश

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंना कोणाकडून धोका? टीडीपीची सुरक्षेसाठी केंद्र सरकारला विनंती

रवींद्र देशमुख

Skill Development Corporation Case: तुरुंगात असलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेबाबत तेलगू देसम पक्ष चिंतित आहे. याबाबत तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) जिल्हाध्यक्ष किमिदी नागार्जुन यांनी केंद्र सरकारला राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात बंद माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले.

नायडू यांना गुन्हेगार आणि माओवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या, ते गुन्हेगार याच कारागृहात असल्याचं सांगण्यात येत आहे.

कारागृह अधीक्षकांच्या अचानक बदलीबद्दल नागार्जुन यांनी चिंता व्यक्त केली. तुरुंगात असलेल्या नायडूंना इजा करण्याचा हा कट असू शकतो, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, तुरुंगात असलेल्या आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत सर्वसामान्यांना चिंता आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण चंद्राबाबू नायडू यांच्यावर अन्याय झाल्याचे सर्वांच्या लक्षात आलं आहे. तुरुंगातून सुटका होईपर्यंत जिल्ह्यात उपोषण व इतर आंदोलने सुरूच राहणार असल्याचंही नागार्जुन यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi On Digital Arrest : तुम्हालाही 'डिजिटल अरेस्ट'चा धोका... PM मोदींनी सांगितले बचावाचे उपाय

Mohammad Shami ने मागितली BCCI ची माफी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतर पोस्ट केला Video

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात, मुंडेंचा विरोधकही ठरला

Latest Maharashtra News Updates Live : आरपीआयला दोन जागा देण्याची रामदास आठवले यांची मागणी

Diwali 2024 Jewellery: पारंपारिक कपड्यांसह शोभून दिसतील 'हे' दागिने, दिवाळीच्या दिवशी दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT