नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत (Second Wave) मृत्युमुखी (Death) पडलेल्यांचे सरकारी आकडे (Government) आणि वास्तविक स्थिती यात मोठी तफावत असल्याचे उघड होऊ लागले आहे. या संसर्गाचा ज्या राज्यांना फटका बसला त्यांनी केंद्राकडे आकडेवारी पाठवताना केवळ रुग्णालयांमध्ये (Hospital) आणि त्यातही सरकारी रुग्णालयांमध्येच मृत्युमुखी (Death) पडलेल्यांची आकडेवारी पाठवली. त्यामुळे घरांमध्ये ज्या कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले त्याचे आकडे सरकारपर्यंत पोचलेले नाहीत, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य यंत्रणेने नोंदविले आहे. (Central Government Suspects States have Withheld Information about the Dead)
बिहार सरकारने मृतांच्या आकड्यांबाबत केलेली हेराफेरी उघड झाल्यानंतर आता अन्य राज्यांच्या आकडेवारीबाबत देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
मध्यंतरी उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह वाहून आल्यानंतर संसर्गाची भयाण स्थिती उघड झाली होती. कोरोना मृतांची खरी आकडेवारी ही सरकारी आकडेवारीच्या किमान पंचवीस ते तीस पटींनी जास्त असल्याची शंका तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.
बिहारमुळे संशय बळावला
बिहारमध्ये बुधवारी एका दिवसात कोरोना मृतांची संख्या ७३ पटीने वाढून कालच्या ५४०० वरून आज ९ हजार ३७५ वर पोचली होती. कोरोना संसर्गाबाबतची दैनंदिन आकडेवारी समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही संपूर्ण संसर्गाच्या काळात रोज मरण पावलेल्यांपेक्षा अधिक होती. ती ६ हजार १४८ वर पोचली होती. यापूर्वी हीच संख्या रोज अडीच ते साडेतीन हजारांच्या घरात असल्याचे केंद्रांकडून दाखविले जात होते. कोरोनामुळे देशातील किमान पावणेचार लाख लोक अधिकृतरीत्या मृत्युमुखी पडले असले तरीसुद्धा ही आकडेवारी कैकपटीने अधिक असू शकते.
त्यांची नोंदच नाही
संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे मार्च ते मे चा पहिला आठवडा या काळात कोरोनाने देशात धुमाकूळ घातला होता. यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले होते. देशभर ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला. याच काळामध्ये घरात विलगीकरणात असलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर मरण पावल्याचे उघड झाले. सरकारी यंत्रणेने मात्र या मृत्यूंची फारशी दखल घेतली नाही.
ही माहितीच नाही
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रत्येक राज्याकडून दररोज संध्याकाळी एक अहवाल येतो. तो दुसऱ्या दिवशी सकाळी अपडेट होतो. मागील २४ तासांतील नवे कोरोना रुग्ण, बरे झालेले व मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची आकडेवारी त्यामध्ये असते. त्याच आधारावर केंद्रातर्फे सकाळी आठ वाजता संसर्गाची परिस्थिती जाहीर केली जाते. मात्र ज्यांचा घरातच मृत्यू झाला त्यांची माहिती राज्यांच्या डेटा सिस्टीममध्ये अपलोड केली जात नसल्याचे केंद्रीय यंत्रणेचे म्हणणे आहे.
सगळा गोंधळ
स्मशानभूमीतील नोंदी, सरकारी आकड्यांत फरक
घरगुती विलगीकरणातील मृतांची नोंदच नाही
मोठ्या राज्यांनी खरे आकडे दडविल्याचा संशय
बेवारस स्थितीत अनेकजण मरण पावल्याची शक्यता
स्थानिक यंत्रणा मृत्यूच्या नोंदीबाबत उदासिन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.