Central Government Umang App esakal
देश

Umang App : शेतकऱ्यांची गैरसोय आता दूर होणार; 'उमंग'द्वारे मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा

केंद्र सरकारने ‘उमंग’ हे ॲप (Umang App) विकसित केले आहे.

प्रशांत घाडगे

आतापर्यंत महाभूमी पोर्टलवरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीत नमुने डाऊनलोड केले आहेत.

सातारा : सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmer) महा ई सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये सर्व्हर डाऊन अथवा गर्दी असल्यास सतत हेलपाटे मारावे लागतात. या अडचणीतून पर्यायी मार्ग निघाला आहे. आता डिजिटल स्वाक्षरीकृत असलेला सातबारा उतारा मोबाइलवरून ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहेत.

त्यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ हे ॲप (Umang App) विकसित केले आहे. पोर्टलप्रमाणे पंधरा रुपयांत उतारा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. विविध कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार सातबारा उताऱ्यांची आवश्‍यकता भासते. त्यातच कित्येक कामांना चालू तारखेचे उतारे आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांना ऐनवेळी धावपळ होतानाचे चित्र दिसून येते.

त्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सातबारा खाते उताऱ्यासाठी उमंग ॲप विकसित केले आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांत ४४ हजार ५६० महसुली गावे आहेत. यात दोन कोटी ५७ लाख सातबारा संगणकीकृत केले आहेत. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त उतारे डिजिटल स्वाक्षरीकृत केले आहेत. राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा त्यावर उपलब्ध असणार आहेत.

महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवरून उपलब्ध होत आहेत. आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाईल ॲपवरून उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड, ॲपल मोबाइलसाठी ॲप्स स्टोअरवरून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत महाभूमी पोर्टलवरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीत नमुने डाऊनलोड केले आहेत. त्यातून राज्य सरकारला १०५ कोटी ७५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. आजअखेर महाभूमी पोर्टलवर २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत.

यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा उताऱ्याची प्रत मिळवण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे १५ रुपयांच्या सातबारा उतारासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. पोर्टलवर ही सुविधा केवळ १५ रुपयांत देण्यात येत होती. आता उमंग मोबाईल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, ॲपवरून संबंधित व्यक्तीच्या खात्यात पैसे भरता येतील. तसेच, ॲपवरून सातबारावरील डॉक्युमेंट आयडीवरून त्याची अचूकता पडताळणी करता येणे शक्य होईल. उमंग ॲपवरच खाते तयार करून त्यात पैसे जमा करून ओटीपी आल्यानंतर या खात्यातून १५ रुपये वजा झाल्यावर उतारा डाऊनलोड होईल.

सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीत काढण्यासाठी केंद्र सरकारने उमंग ॲप विकसित केले आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे व सहज शक्य असून, त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

-प्रशांत आवटी, उपजिल्हाधिकारी, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT