rajpath delhi sakal
देश

Central Vista Avenue : पहिला टप्पा गुरुवारपासून खुला, अशी असणार रचना

राजपथावरील प्रस्तावित सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : जागोजागी काम सुरू आहे.... पादपथ, खाद्यपदार्थांचे स्टॉल, बोटींगसाठीचे छोटे तलाव, विविध फुलांनी बहरलेले ताटवे यांचे दूर-दर्शनही नयनरम्य भासत आहे...हजारो कामगार कामावर अखेरचा हात फिरवत आहेत... राजपथ नव्हे आता ‘कर्तव्य' पथ सजला आहे.... इंडिया गेट किंवा रफी मार्गावरून नजर टाकली तरी नवीन सेंट्रल व्हिस्टा ॲव्ह्न्यतील या सरळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा ३.९० लाख चौरस मीटरचा परिसर हिरवाईने नटला असून येथे फेरफटका मारल्यावर दोन्ही बाजूंचे नयनरम्य दृश्य नजरेत भरते.

राजपथावरील प्रस्तावित सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यूचे उद्घाटन गुरूवारी (ता. ८) होणार आहे. फेब्रुवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या जेमतेम दीड वर्षांत या भागाचा कायापालट झाला आहे. महाराष्ट्रासह किमान २२ राज्यांची वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांचे स्टॉल येथे असतील. या ॲव्हेन्यूचा इंडिया गेट ते मानसिंह मार्गापर्यंतचा टप्पा नागरिकांसाठी येत्या गुरूवारपासून खुला होणार आहे. त्यापुढे संसदेपर्यंत मुख्य सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरू रहाणार असल्याने तेथील भव्य इमारतींचे काम यापुढे चालू राहील. संध्याकाळीच नव्हे तर चोवीस तास या भागात किमान ५० सुरक्षारक्षक व स्वच्छता कर्मचारी तैनात असतील. त्यांच्याशिवाय ३०० सीसीटीव्हीदेखील लोकांवर ‘नजर' ठेवून राहतील.

अशी असणार रचना....

- राजपथाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कालव्यांपैकी १९ एकर भागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. छोटे छोटे १६ पूल या कालव्यांना जोडतील.

- सध्याच्या कृषी भवनाच्या मागील बाजूंच्या तलावांत बोटींगची सुविधा असेल.

- नागरिकांना फिरण्यासाठी १५.५ किमीचे लाल ग्रॅनाईट पदपथ असतील.

- येथील पार्किंगच्या जागेत ११२५ वाहनांची व्यवस्था असेल. मोठ्या बसेस साठी इंडिया गेटजवळ जागा निश्चित करण्यात आली असून एका वेळी ४० बसेस येथे उभ्या राहू शकतील.

-पार्किंग सुरुवातीला एकदीड महिन्यासाठी विनामूल्य असेल, नंतर त्याचे दर नवी दिल्ली महानगरपालिका (एनडीएमसी) ठरवेल.

- राजपथाची शोभा वाढविणारे ७५ एतिहासिक पथदिव्यांचे नव्याने सौंदर्यीकरण केले आहे. याशिवाय नवीन भागात ९०० दिवे असतील.

- ज्यांना राजपथावर खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी प्रत्येकी ४० विक्रेत्यांचे व ८-८ दुकनांत विभागलेले ५ विभाग तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह विवध राज्यांच्या २०० विक्रेत्यांचे स्टॉल्स येथे असतील.

- दोन्ही भागांना जोडण्यासाठी षटकोनी आकाराचे चार भूमीगत पादपथ (अंडरपास) असतील.

-मानसिंग रोड ते जनपथ, जनपथ ते रफी ​​मार्ग गुरूवारपासूनच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. उर्वरित दोन भाग- इंडिया गेट आणि सी-हेक्सॅगन नंतर सामान्यांसाठी खुले होतील.

- या रस्त्यावर सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यू परिसरात जुनी- नवी मिळून सुमारे ५००० झाडे आहेत. प्राचीन वृक्ष सरसकट तोडू नका अशा सूचना खुद्द पंतप्रधानंनीच संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT