कोरोना लस  sakal
देश

भारतात आणखी दोन कोविड लसींसह अँटी-व्हायरल औषधाला मंजुरी

देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 साठी आणखी दोन लसी आणि एका अँटी-व्हायरल औषधाच्या वापराला आपतकालीन मंजुरी दिली आहे. कोरोना लस कॉर्बेवॅक्स आणि कोव्होव्हॅक्स या दोन लसींसह अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीर आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी ट्वीटद्वारे दिली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'CORBEVAX लस ही भारतातील पहिली स्वदेशी 'RBD प्रोटीन सब-युनिट' ही लस भारतात विकसित करण्या आलेली ही तिसरी लस असून हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ईने याची निर्मिती केली आहे. याशिवाय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे नॅनोपार्टिकल लस, COVOVAX ची निर्मिती करणार असून, अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरची निर्मिती आता देशातील 13 कंपन्या करणार आहेत.

दरम्यान, नव्याने देण्यात आलेल्या लसींमुळे साथीच्या विरुद्धच्या जागतिक लढ्याला आणखी बळ मिळण्यास मदत होणार असल्याचे मांडविया यांनी स्पष्ट केले आहे. भारतात आतापर्यंत, कोविशील्ड, कोव्हॅसिन, ZyCoV-D, स्पुटनिक V, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, Corbevax आणि Covovax यांच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT