Linking Of aadhar & voter ID latest marathi news esakal
देश

linking Aadhaar voter ID: आधार-मतदान ओळखपत्र जोडण्याची मुदत पुन्हा वाढली; जाणून घ्या नवी तारीख

आधार-मतदान कार्ड जोडण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२३ होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२३ ही शेवटची तारीख होती, याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयानं याबाबत पत्रक काढलं असून त्यामध्ये आधार क्रमांक आणि मतदान कार्ड जोडण्याची मुदत वाढवण्याबाबत कायद्यात बदल केल्याचं म्हटलं आहे. या बदलानुसार, यापूर्वी या जोडणीची मुदत १ एप्रिल २०२३ होती ती आता ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे.

दरम्यान, या महिन्यात मुदत संपणार असल्यानं ती पुन्हा वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळं अपेक्षेप्रमाणं ही मुदतवाढ झाली आहे.

हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मोहिमेला महाराष्ट्रातून झाली होती सुरुवात

केंद्रीय निवडणूक आयोगानं महत्वाचा निर्णय घेत निवडणूक मतदान कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आयोगाच्या या मोहिमेला १ ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात झाली. देशभरात महाराष्ट्रातून या मोहिमेला सुरुवात झाली होती. आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक केल्यामुळे मतदाराची ओळख पटवणं अधिक सोपं होणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं.

"मतदारांची ओळख पटविण्यासाठी आणि मतदार यादी तपासण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नाव नोंदणी होणं असे प्रकार यामुळं टाळता येणार आहेत", असं महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT