Jumbo covid care centre, Pune file photo
देश

कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज नाही; केंद्राचं नवं धोरण

कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याबाबत केंद्र सरकारने धोरणामध्ये मोठा बदल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याबाबत केंद्र सरकारने धोरणामध्ये मोठा बदल केला आहे. त्यानुसार आजवर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं होतं. पण नव्या बदलांनुसार उपचारांसाठी आता पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज असणार नाही. यापूर्वीच्या धोरणानुसार रुग्णांमध्ये कोविडची लक्षण असतील पण त्यांच्याकडे पॉझिटिव्ह रिपोर्ट नसेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार होऊ न शकल्यामुळे मृत्यूलाही सामोरं जावं लागलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता सर्व राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत की त्यांनी तीन दिवसांमध्ये या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरु करावी. या नव्या धोरणामुळे कोरोना संशयीत रुग्णांना त्यांच्यासाठीच्या खास वॉर्डमध्ये दाखल होता येणार आहे. यामध्ये कोविड केअर सेंटर, पूर्ण समर्पित कोविड केअर सेंटर आणि कोविड रुग्णालयांचा समावेश आहे. त्याचबरोबर नव्या धोरणामध्ये हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, एखादा रुग्ण कोणत्या राज्यातला आहे यावरुन त्याला उपचार नाकारले जाऊ शकत नाहीत. कोणत्याही रुग्णाला कुठेही उपचारांसाठी दाखल होता येणार आहे.

ओळखपत्र नसलेल्यांचंही लसीकरण होणार

दरम्यान, कोणतंही ओळखपत्र नसलेल्या लोकांचंही लसीकरण करण्याची मार्गदर्शक तत्वे आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार ओळखपत्र नसलेल्या लोकांचंही कोविन पोर्टलवर नोंदणी केली जाईल. तसेच त्यांच्या लसीकरणासाठी विशेष कॅम्प आयोजित केले जातील. या लोकांची ओळख पटवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल.

होम आयसोलेशनसाठी नव्या गाईडलाईन्स

आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलान्समध्ये म्हटलंय की, "होम आयसोलेशनमध्ये १० दिवस असताना शेवटचे सलग तीन दिवस रुग्णाला ताप न आल्यास रुग्ण होम आयसोलेशनमधून बाहेर येऊ शकतात. तसेच त्यानंतर त्यांना कोविड चाचणी करुन घेण्याची गरजही नाही. पण यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाला सैम्य आणि विनालक्षण असल्याचं जाहीर केलं पाहिजे. या प्रकरणात रुग्णाची होम आयसोलेशनची त्याच्या घरीच व्यवस्था होणं गरजेचं आहे. असे रुग्ण ज्या खोलीत राहतात तिथे त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन ९४ टक्क्यांहून अधिक असायला हवं तसेच त्या रुममध्ये हवा खेळती रहायला हवी"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT