देश

येडियुरप्पांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हान 

बी. बी. देसाई

बेळगाव - भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय त्यांच्या एकाधिकारशाहीला पक्षातीलच कांही नेते कंटाळले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यास त्यांना अपयश आल्यास पक्षातील त्यांचा प्रभाव कमी होऊन ते एकाकी पडण्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. 

कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर व राज्यातील पक्षाच्या स्थिती - गतीवर पक्षश्रेष्ठी बारीक लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील सद्यस्थिती हाताळण्यात येडियुरप्पा यांना अपयश आल्यांने पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. येडियुरप्पा यांच्या धोरणामुळे भाजपला कर्नाटकात सत्ता गमवावी लागली. परिणामी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला. 

विधान परिषद सदस्य लेहर सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून येडियुरप्पांचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली असल्याचे समजते. येत्या लोकसभा निवडणुक राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यावर पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. 

कॉंग्रेस व धजदच्या अतृप्त आमदारांना वश करून घेण्याचा प्रयत्न भाजप नेते संघटितपणे करीत नाहीत. प्रत्येकजण स्वतंत्रपणे प्रयत्न करीत आहे. शिवाय पक्षाबाहेरील लोकच त्यात अधिक प्रयत्नशील आहेत. येडियुरप्पा यांच्याकडे कांही प्रस्ताव घेऊन गेल्यास त्याचा ते विचार करीत नाहीत, अशी काही नेत्यांची तक्रार आहे. 

येडियुरप्पा यांचे मत, त्यांची कार्यपध्दती भाजपचे स्थानिक नेते के. एस. ईश्वरप्पा, आर. अशोक, सी. टी. रवी, जगदीश शेट्टर यांना मान्य नाही. सी. पी. योगेश्वर, अश्वत्थ नारायण, शोभा करंदलांजे हे नेते येडियुरप्पा यांचे समर्थक आहेत. कॉंग्रेस व धजदमधील असंतुष्टांचा वापर आपला प्रभाव वाढविण्यासाठी येडियुरप्पा करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप कांही नेते आहेत. त्यामुळे असंतुष्टाना भाजपमध्ये आणण्यात ते अडथळा निर्माण करीत असल्याचे समजते. 

येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच अधिक उपयोग होईल, असे मत कांही भाजप नेत्यांचे आहे. भाजपने लोकसभा निवडणुपकीत 22 ते 23 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. कॉंग्रेस व धजदची युती कायम राहील्यास त्यांचे हे उद्दिष्ट साध्य होणे अवघड आहे. येडियुरप्पा धजद व कॉंग्रेसची युती मोडण्यासाठी कांहीच प्रयत्न करीत नसल्याचीही भाजपमधीलच कांहीजणांची तक्रार आहे.

कर्नाटकात ऑपरेशन कमळ राबविल्यास राज्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नाव बदनाम होईल, त्याचा फायदा कॉंग्रेसलाच अधिक होईल, असे कांही नेत्यांचे मत आहे. 
एकंदरी येडियुरप्पांच्या राज्यातील नेतृत्वाला ग्रहण लागण्याची शक्‍यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT