chandigarh mayor election results bjp manoj sonkar win in mayor election 2024 aap kuldeep kumar lose politics Sakal
देश

Chandigarh Mayor Election : महापौर निवडणुकीत भाजपचा ‘दे धक्का’; चंडीगडमध्ये मनोज सोनकर विजयी; ‘आप’चे कुलदीप कुमार पराभूत

देशाचे लक्ष लागलेल्या चंडीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपने ‘आप’सह विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीलाही जोरदार धक्का दिला. ‘आप’ व काँग्रेसने युती केल्याने त्यांच्याकडे विजयी होण्यासाठी बहुमत होते. तरीही, भाजपने त्यांचा धक्कादायक पराभव केला.

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : देशाचे लक्ष लागलेल्या चंडीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपने ‘आप’सह विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीलाही जोरदार धक्का दिला. ‘आप’ व काँग्रेसने युती केल्याने त्यांच्याकडे विजयी होण्यासाठी बहुमत होते. तरीही, भाजपने त्यांचा धक्कादायक पराभव केला.

भाजप आणि आम आदमी पक्षासह(आप) ‘इंडिया’ आघाडीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप उमेदवार मनोज सोनकर यांनी १६ मते मिळवीत विजय मिळविला तर आपच्या कुलदीप कुमार यांना १२ मते मिळाली. त्याचप्रमाणे, आठ नगरसेवकांची मते अवैध घोषित करण्यात आली. त्यामुळे, भाजप उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या या निवडणुकीसाठी ‘इंडिया’तील काँग्रेस व आप या पक्षांनी हातमिळवणी केली असल्याने महत्त्व प्राप्त झाले होते. चंडीगड महापालिकेतील एकूण ३५ नगरसेवकांपैकी भाजपचे १४, आपचे १३ काँग्रेसचे सात नगरसेवक तर अकाली दलाचा एक नगरसेवक आहे.

येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. चंडीगडच्या महापौरपदाची निवडणूक १८ जानेवारीला होणार होती. मात्र, पीठासीन अधिकारी आजारी पडल्याने ती सहा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. प्रशासनाच्या या निर्णयाला आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यानंतर, न्यायालयाने ही निवडणूक ३० जानेवारीला घेण्याचे निर्देश दिले होते. चंडीगड महापालिकेत महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौरपदाची निवडणूक दरवर्षी होते. यापूर्वी, २०२२ व २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांना मतदानापासून रोखण्यात आले होते. यावर्षी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते.

चंडीगडचे नवनिर्वाचित महापौर आता वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौरपदाची निवडणूक घेतील. ‘इंडिया’ आघाडीचा घटकपक्ष म्हणून आपने महापौरपदासाठी उमेदवार दिला होता. आता, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असेल.

भाजपकडून फसवणूक : केजरीवाल

हा निकाल घोषित होताच आप व काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला. भाजपने दिवसाढवळ्या फसवणूक केल्याचा आरोप आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वरून केला. जर हे लोक (भाजप) महापौर निवडणुकीत ही पातळी गाठत असतील तर ते राष्ट्रीय निवडणुकीत कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे खूप चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तावडेंची रणनीती यशस्वी

भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पुन्हा ‘एनडीए’त आणून भाजपला राज्यात पुन्हा सत्तेवर आणत ‘इंडिया’ आघाडीला धक्का दिला होता. त्यानंतर ते महापौर निवडणुकीसाठी चंडीगडमध्ये दाखल झाले होते. भाजपकडे बहुमत नसतानाही त्यांची खेळी यशस्वी झाली. गेल्यावर्षीही त्यांच्या रणनीतीमुळे चंडीगड महापालिकेत भाजपचा उमेदवार निवडून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT