Chandigarh University esakal
देश

Chandigarh University : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

मोहालीतील चंदीगड विद्यापीठात शनिवारी रात्री उशिरा मोठा गोंधळ झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोहालीतील चंदीगड विद्यापीठात शनिवारी रात्री उशिरा मोठा गोंधळ झाला आहे.

पंजाबच्या मोहालीतील (Punjab Mohali) एका विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली होती. एका विद्यार्थिनीनं (Girl) आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील (Girls Hostel) 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यापीठाच्या गेट क्रमांक 2 वर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असून शेकडो विद्यार्थी इथं जमून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, पोलिस आल्यानंतर व कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थिनी शांत झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे.

चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ

मोहालीतील चंदीगड विद्यापीठात (Chandigarh University) शनिवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. रात्री अडीचच्या सुमारास अनेक मुलींनी इथं पोहोचून निदर्शनं केली. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. ही विद्यार्थिनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आलीय.

एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर

विद्यापीठासमोर रात्री विद्यार्थिनींनी प्रचंड गोंधळ घातलाय. सध्या आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनानं इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत विद्यार्थिनीनं सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमलाचा ​​रहिवासी आहे. मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आलेली नाहीय. दरम्यान, 60 विद्यार्थिनींचे एमएमएस बनवून इंटरनेटवर अपलोड करण्यात आले. या घटनेमुळं वसतिगृहात राहणाऱ्या 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. माहितीनुसार, यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Ratnagiri Assembly Election Results : साडेनऊ हजार मतदारांनी नाकारले उमेदवार

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

SCROLL FOR NEXT