Chandrababu Naidu sakal
देश

Chandrababu Naidu : चंद्राबाबूंकडे पुन्हा धुरा

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज आंध्र प्रदेशचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी.नड्डा, नितीन गडकरी आणि चिराग पासवान यांच्यासमवेत अन्य मान्यवर नेते उपस्थित होते. राज्यपाल एस. अब्दुल नझीर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चंद्राबाबूंची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. चंद्राबाबू नायडू हे सलग चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. तेलंगण आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर चंद्राबाबू हे मुख्यमंत्री होण्याची दुसरी वेळ आहे.

शपथ घेणाऱ्या २४ मंत्र्यांमध्ये जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, तेलुगू देसम पक्षाचे नेते नारा लोकेश, किंजरापू अच्चनायडू, निम्माला रामानायडू, एनएमडी फारुख, अनम रामनारायण रेड्डी, पय्यावुला केशव, कोल्लू रवींद्र, वंगालापुडी अनिता आदींचा समावेश आहे.

नायडू हे १९९५ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी देखील मुख्यमंत्री बनले होते त्यावेळी त्यांनी २००४ पर्यंत म्हणजे सलग नऊ वर्षे राज्याचे नेतृत्व केले होते. आंध्रचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री बनले त्यानंतर १०१९ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी होते. आजच्या सोहळ्याला तेलंगणचे माजी राज्यपाल तमीळसाई सुंदरराजन, चंद्राबाबू याचे पुत्र आणि तेलुगू देसम पक्षाचे सरचिटणीस नरा लोकेश, केंद्रीयमंत्री राममोहन नायडू, अभिनेता चिरंजीवी, रजनीकांत, नंदमुरी बालकृष्ण आदी उपस्थित होते.

असाही विजय

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष- जनसेना आणि भाजप यांच्या आघाडीने १७५ सदस्यांच्या विधिमंडळातील १६४ जागांवर विजय मिळविला आहे. तेलुगू देसम पक्षाने १३५ जागा जिंकल्या असून भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. वायएसआर काँग्रेसला या निवडणुकीत जबर फटका बसला असून या पक्षाच्या जागा १५१ वरून थेट अकरावर आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT