काँग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यंदा काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळं भाजपकडून पाच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.
तसेच राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. (Chandrakant Handore has been announced as Rajya Sabha candidate by Congress)
महाविकास आघाडीकडून एकूण एकापेक्षा जास्त उमेदवार देईल असं सांगितलं जात होतं. पण काँग्रेसकडून सावध पवित्रा घेत एकच उमेदवार दिला आहे. पण या राज्यसभेच्या निवडणुकीतही विधानपरिषदेप्रमाणं रणनिती केली जाऊ शकते. राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. (Latest Marathi News)
राज्यसभेची निवडणूक होणार की बिनविरोध होणार
दरम्यान, अद्याप भाजपकडून राज्यसभेची यादी जाहीर झालेली नाही. पण महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिल्यामुळं भाजपकडून पाच उमेदवार दिलं जाण्याची शक्यता आहे. पण जर पुन्हा विधानपरिषदेसारखी निवडणूक भाजपला घडवून आणायची असेल तर भाजपकडून सहा उमेदवार दिले जाऊ शकतात. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार नाही तर त्याची निवडणूक होईल. त्यामुळं पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.