CM Siddaramaiah and DK Shivakumar Bangalore  esakal
देश

सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सोडणार? DK शिवकुमारांना मिळणार संधी? 'या' स्वामींच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून खूप अनुभव आहे. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी आता पद सोडावे. पुढील काळात त्यांचे कल्याण होवो.

बंगळूर : सर्वजण मुख्यमंत्री झाले पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद सोडून शिवकुमार यांना संधी द्यावी, असे आवाहन विश्व वक्कलीग महासंस्थान मठाचे (Vishwa Vokkaliga Mahasansthan Math) श्री चंद्रशेखर स्वामीजी (Chandrashekar Swamy) यांनी केले आहे.

नाडप्रभू केम्पेगौडा हेरिटेज साईट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, बीबीएमपी आणि कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे शहरातील कंठिरवा स्टेडियमवर आयोजित नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिवकुमार हे व्यासपिठावर उपस्थित होते.

चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले, ‘सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी मन मोठे केल्यास हे शक्य आहे. सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा सलाम करतो. कृपया, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा. सर्वांनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगली आहे. आमचे शिवकुमार झाले नाहीत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून खूप अनुभव आहे. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी आता पद सोडावे. पुढील काळात त्यांचे कल्याण होवो. हे केवळ सिद्धरामय्याच करू शकतात. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची विनंती करत आहे.’

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन प्रांत निर्माण केले आणि उत्तर कर्नाटकचा सर्वांगीण विकास झाला तर त्या भागातून बंगळूरला होणारे स्थलांतर टाळता येईल, असेही स्वामीजी म्हणाले. कार्यक्रमाला पट्टनायकनहळ्ळी श्रीक्षेत्र श्री स्पटिकपूर महासंस्थानचे अध्यक्ष श्री डॉ. नंजावधूत स्वामीजी, आदिचुंचनगिरी महासंस्थेचे पीठाध्यक्ष डॉ. श्री निर्मलानंदनाथ महास्वामीजी, मंत्री कृष्णा भैरेगौडा, शिवराज तंगडगी, आमदार रिझवान हर्षद, विश्वनाथ, विधान परिषद सदस्य पुटण्णा, गोविंदराजू, सलीम अहमद, रामोजी गौडा, वक्कलीग संघाचे अध्यक्ष हनुमंतरायप्पा आदी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांडचा’

स्वामीजींच्या आवाहनानंतर पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देताना सिध्दरामय्या म्हणाले, ‘मुख्यमंत्री बदलण्याचा अधिकार हा विषय पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही कार्य करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू- सुप्रिया सुळे

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT