देश

Chandrayaan2:विक्रम लँडरचे तुकडे झालेले नाहीत; आशा कायम

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू : शनिवारी पहाटे भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेला शेवटच्या टप्प्यात ‘ग्रहण’ लागले. चंद्राच्या पृष्ठ भागापासून २.१ किलोमीटवर असताना इस्रो मुख्यालयाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांसह तमाम भारतीयांची निराशा झाली. पण, चंद्राच्या भोवती फिरणारा ऑर्बिटर सुरक्षित असल्याने त्याच्याकडून मिळालेली माहिती आता शास्त्रज्ञांना दिलासा देणारी आहे.

लँडर योग्य स्थितीत
विक्रम लँडर दोन किलोमीटर अंतरावरून चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळला आहे. पण, सुदैवाची गोष्ट ही की त्याचे तुकडे न होता तो सुरक्षित आहे. लँडरच्या आता प्रग्यान हा रोव्हर आहे. सध्या विक्रम लँडर आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे लँडरला कमांड देण्यात इस्रो मुख्यालयातील शास्त्रज्ञांना अडथळे येत आहे. सुदैवाने लँडर सुरक्षित योग्य पोझिशनला उतरला असल्यामुळे त्याच्या संपर्क होण्याच्या आशा कायम आहेत. ‘आम्ही लँडरशी संपर्क करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत,’ अशी माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. लँडर चंद्रावर पडल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी पुढचे १४ दिवस महत्त्वाचे आहेत. या १४ दिवसांत लँडर आणि ऑर्बिटरचा संपर्क होईल, अशी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे.

संपर्क झाल्यास काय?
विक्रम लँडरचा ऑर्बिटरमार्फक इस्रो मुख्यालयाशी संपर्क झाला तर, लँडरमधील रोव्हरला कमांड देण्यात यश येणार आहे. परिणामी लँडरमधील रोव्हरला बाहेर काढून, त्याच्या मार्फत चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा करण्यात यश येणार आहे. त्यासाठी लँडर आणि ऑर्बिटर यांच्यात संपर्क होणं गरजेचं आहे. संपर्क झाल्यास चंद्राच्या दक्षिण धृवावरील खनिजांचा, मातीचा अभ्यास करता येणार आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण धृवावर पाऊल ठेवलेले नाही. त्यामुळे भारतासाठीच नव्हे, तर मानवी जातीसाठी चांद्रयान-२ मोहीम महत्त्वाची आहे. जर, लँडरशी संपर्क झाला. पण, रोव्हरला बाहेर काढण्यात यश आले नाही तर, लँडरवरील कॅमेऱ्यांच्या साह्याने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.

ऑर्बिटर फिरत राहणार
‘विक्रम’शी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर सुस्थितीत आहे. ‘विक्रम’शी संपर्क तुटल्यानंतर या ऑर्बिटरबाबतही शंका उपस्थित झाली होती. मात्र, या ऑर्बायटरची स्थिती उत्तम असून, ते पूर्ण क्षमतेने काम करीत आहे, असे ‘इस्रो’ने सांगितले आहे. या ऑर्बिटरचे वजन २३७९ किलो असून, ते चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरील कक्षेतून निरीक्षणे नोंदवत आहे. ‘विक्रम’शी संपर्क नसला तरी ऑर्बिटर मात्र कक्षेत फिरत असून, त्याच्याकडून बरीच माहिती मिळेल.  शिवाय, या ऑर्बिटरमध्ये बरेच इंधन बाकी असल्याने तो पुढील एक वर्ष नव्हे, तर साडेसात वर्षे चंद्राभोवती फिरेल, असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: १८ वर्षीय खेळाडूसाठी मुंबईचा हट्ट; मराठमोळा तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सकडे

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT