Chandrayaan 3 India Great Achivement but NASA Tweet Viral : जगभरामध्ये भारताच्या नावाचा डंका आहे. त्याला कारणही खास आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेनं जगात आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर उतरल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या क्षणाची सारे भारतीय वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आणि भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले. गेल्या काही वर्षांपासून इस्त्रो मधील शास्त्रज्ञ मोठ्या मेहनतीनं ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी लक्ष ठेवून होते. प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी खरी करुन दाखवली आहे. यासगळ्यात जगभरातील वेगवेगळ्या देशांनी आता भारतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
अमेरिकेनं देखील भारताची प्रशंसा केली आहे. अमेरिकेची नासा ही संस्था जगातील सर्वाधिक प्रभावशाली असल्याचे म्हटले जाते. मात्र त्यांना देखील भारतानं केलेली कामगिरी सर करणं शक्य झालं नाही. भारतानं तिसऱ्या प्रयत्नात ही मोहिम फत्ते केली आहे. नासानं खास ट्विट करुन भारताचं कौतुक केलं आहे. मात्र त्यात त्यांनी जो उल्लेख केला आहे. तो काही नेटकऱ्यांना खटकला आहे.
नासानं आपल्या ट्विटमध्ये चंद्रावर यशस्वी मोहीम राबवणारा भारत हा ठरला चौथा देश. असे म्हटले आहे. त्यामुळे नासानं उल्लेख केलेली ती बाब नेटकऱ्यांना खटकली आहे. काहींनी ती गोष्ट नासाच्या लक्षातही आणून दिली आहे. एका नेटकऱ्यानं सर, आपण भारताचा उल्लेख हा चौथा न करता तो पहिला देश म्हणून करावा. त्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्या ट्विटमध्ये नासा म्हणते की, तुमच्या चांद्रयान ३ मोहिमेचं खूप खूप कौतुक. भारताचे मनपूर्वक अभिनंदन. चंद्रावर यशस्वीपणे मोहिम फत्ते करणारा भारत हा आता चौथा देश झाला आहे. आम्हाला खूप आनंद होतो आहे की, आम्ही या मिशनमध्ये तुमचे पार्टनर होतो. अशा शब्दांत नासानं भारताचे कौतुक केले आहे.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची स्तुती करत त्यांना धन्यवाद दिले आहे. या मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचं सांगत त्यांनी हा क्षण भारतासाठी नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.