Chandryaan 3  esakal
देश

Chandryaan 3 : 32000 वर्षांपूर्वी वेळकाळ जाणून घेण्यासाठी व्हायची चंद्राची मदत, चीन-अरबांनी सुद्धा भारताकडून शिकून घेतली होती ही कला

सकाळ डिजिटल टीम

Chandryaan 3 : जेव्हा माणसाकडे वेळ मोजण्याचे कोणतेही साधन नव्हते, तेव्हा चंद्राच्या वाढत्या आणि घटत्या आकारावरून दिवस आणि महिन्यांचा अंदाज लावला जात असे.23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. हजारो वर्षांपासून चंद्र हा जगभरातील संस्कृतींमध्ये जीवनाचा एक अविभाज्य अंग राहिला आहे. माणूस जेव्हा आदिमानव स्वरूपात होता तेव्हापासून आज अखेरपर्यंत चंद्र हा त्याच्यासाठी वेळ मोजण्याच एक साधन आहे. ऋग्वेद आणि शतपथ ब्राह्मण हे दोन ग्रंथ सांगतात की हजारो वर्षांपासून चंद्र मानवासाठी वेळ मोजण्याचं साधन ठरला आहे.

जेव्हा माणसाकडे वेळ मोजण्याचे कोणतेही साधन नव्हते, तेव्हा चंद्राच्या वाढत्या आणि घटत्या आकारावरून दिवस आणि महिन्यांचा अंदाज लावला जात असे. महिन्याची गणना 15 दिवस अमावस्या आणि 15 दिवस पौर्णिमा अशा दोन बाजू एकत्र करून केली जाते, ज्याला चंद्रमास म्हणजेच चंद्राचा महिना म्हणतात.

आजही भारतीय ज्योतिषशास्त्रात, हिंदू कॅलेंडर केवळ चंद्र महिन्यापासून बनवले जाते. सर्व तिथी सण यावरून ठरवले जातात. नासाच्या अहवालानुसार, अश्मयुगातील फ्रान्स आणि जर्मनीच्या गुहांमध्ये राहणाऱ्या सुरुवातीच्या मानवांनी 32,000 वर्षांपूर्वी चंद्राच्या हालचालींचा अभ्यास करून पहिले कॅलेंडर तयार केले. त्यात भारतात मांडण्यात आलेली गणितं सर्वात अचूक होती. चीन आणि अरब देशांनीही भारताकडून प्रेरित होऊन चंद्रावरून कॅलेंडर बनवायला सुरुवात केली.सूर्याबरोबर गणना करणं कठीण होतं म्हणून या कामी चंद्राची मदत घेण्यात आली.

जर्मन अभ्यासक प्रा. मॅक्स म्युलर यांनी त्यांच्या "इंडिया- व्हॉट कॅन इट टीच अस" या पुस्तकात लिहितात, ज्योतिष, आकाश आणि नक्षत्रांबद्दल जाणून घेण्यासाठी भारत इतर कोणत्याही देशाचा ऋणी नाही, त्यांनी हा शोध स्वत: लावला आहे.त्यांनी लिहिले आहे की, चंद्र हे वेळ मोजण्याचे पहिले साधन होते. सूर्योदयानंतर नक्षत्र आणि तारे पाहणे किंवा अंदाज करणे कठीण होते. भारतीय विद्वानांनी चंद्राच्या आधारे दिवस, पक्ष, महिना आणि वर्ष मोजले. चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार करून आकाश 27 नक्षत्रांमध्ये विभागले गेले. मूळ ज्योतिषशास्त्राच्या घटकाचा उगम हजारो वर्षांपूर्वी भारतातच झाला.

वेळेचा हिशोब भारतातूनच चीन आणि अरबस्तानपर्यंत पोहोचला

भारताव्यतिरिक्त चीन आणि अरब देशांमध्येही वेळ मोजण्याचे पहिले साधन चंद्र होते. हिजरी संवत कॅलेंडरमध्येही चंद्रावरून महिने मोजले गेले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी, अरब देशांमध्ये दिवसांऐवजी चंद्राच्या रात्रीच्या संख्येनुसार वेळ ठरवली जात असे. मुघल काळातही अनेक कामांसाठी चंद्ररात्रीचा उल्लेख आढळतो. चंद्र आणि नक्षत्रांची ही गणना भारतातूनच चीन आणि अरब देशांमध्ये पोहोचली.

प्रो. कोलब्रुक आणि बीव्हर यांनी त्यांच्या 'लेटर ऑन इंडिया' या पुस्तकात लिहिले आहे की, चंद्र आणि नक्षत्रांचे ज्ञान भारताला प्रथम मिळाले. चीन आणि अरब देशांच्या ज्योतिषशास्त्राचा विकास ही केवळ भारताची देणगी आहे. त्याची चांद्र मोजण्याची पद्धत भारतातूनच प्रेरित आहे.

वेद आणि पुराणातील चंद्र

वैदिक काळापासून आत्तापर्यंत चंद्राची पूजा ग्रह आणि देवता म्हणून केली जात आहे. त्याच वेळी, ज्योतिषशास्त्रात, चंद्राला उपग्रह नाही तर एक ग्रह म्हटले जाते. पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यामुळे, चंद्र हा सूर्यानंतरचा दुसरा ग्रह आहे, जो पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रभावित करतो. चंद्रामुळेच पृथ्वीवर पाणी आणि औषधे आहेत. ज्यामुळे माणूस दीर्घायुष्य जगू शकतो. वेदांपासून पुराणांपर्यंत आणि ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांपर्यंत चंद्राचे विशेष वर्णन केले आहे.वेदांमध्ये चंद्राच्या कक्षेचा वेग, तेज आणि मार्ग याबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर चंद्राची उत्पत्ती कशी झाली हेही पुराणात सांगितले आहे.

चंद्रावरून कालचक्राचे निर्धारण

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील 84 व्या सूक्त मंत्रात चंद्र स्वयंप्रकाशित नाही असे सांगितले आहे, या तत्त्वाला मंत्रात पुष्टी मिळते. यातील 105 व्या सूक्तात चंद्र आकाशात गतिमान असून रोज फिरत राहतो असे सांगितले आहे.अत्रेय ब्राह्मण ग्रंथानुसार, वैदिक कालखंडातील तिथी चंद्राच्या उदय आणि अस्त यावरून निश्चित केल्या जात होत्या. चंद्र स्वतः महिन्याला तिथीसह शुक्ल आणि कृष्ण पक्षात विभागतो. तैत्तिरीय ब्राह्मणात असे सांगितले आहे की चंद्राचे एक नाव पंचदश आहे. जो 15 दिवसात क्षीण होतो आणि 15 दिवसात पूर्ण होतो.

यानंतर ऋतूंबद्दल बोलताना अथर्ववेदाच्या १४व्या कांडातील पहिल्या सूक्तात चंद्रापासूनच ऋतू निर्माण होतात असे सांगितले आहे. चंद्रामुळे ऋतू बदलतात असे वेदांमध्ये सांगितले आहे. दुसरीकडे, चंद्राच्या प्रभावामुळे 13 महिने पूर्ण होतात, ज्याला अधिकामास म्हणतात. वाजस्नेयी संहितेत या गोष्टीचा उल्लेख आहे.

शतपथ ब्राह्मणात असे म्हटले आहे की पृथ्वीवर उगवणाऱ्या वनौषधींचा आणि वनस्पतींचा रस चंद्रातूनच येतो. देवता जो सोम रस पितात त्याबद्दल ऋग्वेदात म्हटले आहे की, सोम नावाचा लता चंद्रापासूनच रस बनवतो. सोमाचा भाग चंद्र वर्तुळातून देवतांपर्यंत पोहोचतो. देवगण चंद्रातूनच सोमपान करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Teli: राजन तेली आमचेच! दिशाभूल झालेले अनेक जण परतणार; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

Direct Tax: मोदी सरकारच्या दहा वर्षांत प्रत्यक्ष कर संकलन 182 टक्क्यांनी वाढले; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, गुजरात कुठे?

Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून नवीन बॉस ऑफर्सची घोषणा, एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २०,००० रूपयांची सूट आणि २५,००० रूपयांचे अतिरिक्‍त फायदे

IND vs NZ 1st Test : Virat Kohli चा भीमपराक्रम! गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अन् कसोटीत विक्रमी झेप

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

SCROLL FOR NEXT