देश

Peacock: आश्चर्य! मोराच्या वर्तनात कमालीचे बदल, साडेसहा हजार फुटांवर घेतली भरारी; अभ्यासकांनी व्यक्त केली 'ही' भीती

Peafowl News:डेहराडूनच्या ‘वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधील (डब्लूआयआय) ज्येष्ठ संशोधक डॉ. सुरेशकुमार म्हणाले, ‘‘ ही गोष्ट काही साधारण म्हणता येणार नाही. जो पक्षी स्वतःच्या अधिवासाबाबत फारसा गंभीर नसतो तो आता इतक्या उंचावर जाऊ लागला असून त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

सकाळ वृत्तसेवा

डेहराडूनः हिमालयातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने याचा पर्यावरणावर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला असून येथील जैवविविधता आता धोक्यात आली आहे. एरव्ही जमिनीवर अन् छोट्या झाडांवर राहणारा मोरासारखा पक्षी उत्तराखंडमध्ये साडेसहा हजार फूट उंचीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. जिल्ह्यातील जंगलामध्ये दोनदा ठराविक उंचीवर हा पक्षी आढळून आला असून एप्रिल महिन्यात तो काफलीगेर वनक्षेत्रात आढळून आला होता. तो ५ ऑक्टोबर रोजी काथ्यातबारा जंगल परिसरामध्येही आढळून आल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

‘‘ मोराच्या वर्तनात झालेला हा बदल खरोखरच आश्चर्यजनक म्हणावा लागेल. हा पक्षी साधारणपणे समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर राहणे पसंत करतो. आता तो साडेसहा हजार फूट उंचीवर गेल्याचे आढळून आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे वेगाने स्थलांतर होते आहे,’’ बागेश्वर वन विभागाचे अधिकारी ध्यानसिंह करायत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

डेहराडूनच्या ‘वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधील (डब्लूआयआय) ज्येष्ठ संशोधक डॉ. सुरेशकुमार म्हणाले, ‘‘ ही गोष्ट काही साधारण म्हणता येणार नाही. जो पक्षी स्वतःच्या अधिवासाबाबत फारसा गंभीर नसतो तो आता इतक्या उंचावर जाऊ लागला असून त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. आता डोंगराळ भाग आधीप्रमाणे थंड राहिलेला नाही त्यामुळेच मोरासारखा पक्षी उंचावर जाऊ लागला आहे. उंचावरील वातावरण पक्ष्यांच्या अधिवासासाठी अधिक पोषक असते.’’ ‘‘हिमालयाच्या पायथ्याशी शेतीचा विस्तार झाला असून मानवी वस्त्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे हा परिसर अधिक उष्ण झाल्याचे दिसून येते,’’ असेही सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले. या भागातील मोरांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाने काही कॅमेरे देखील लावले होते.

प्रतिकूल हवामानामुळे हा बदल होतो आहे यात शंकाच नाही. मोरासारखा पक्षी कधीच एवढ्या उंचीवर जात नाही. या सगळ्या बदलांचा आपण गांभीर्याने विचार करून त्यावर संशोधन करायला हवे.

- बी. एस. अधिकारी

संशोधक ‘वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (डब्लूआयआय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT