encounter between naxal forces in chattisgarh sakal
देश

Chattisgarh: छत्तीसगडमध्ये 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 3 महिलांचा समावेश; AK 47 रायफल्स जप्त

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियानाला एक मोठं यश आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियानाला एक मोठं यश आलं आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत ९ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. मंगळवारी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर ही चकमक झाली. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. छत्तीसगड सरकारनं या वृत्ता पुष्टी दिली आहे. (Chattisgarh 9 Naxals killed including 3 women naxals AK 47 rifles also seized)

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याची माहिती देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलं की, राज्यातील नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश आलं असून ९ नक्षलवाद्यांना ठार करणं ही मोठी कामगिरी सुरक्षा रक्षकांनी केली आहे. यासाठी सोमवारी २९ एप्रिलच्या रात्री ही मोहिम सुरु करण्यात आली होती. नारायणपूर आणि कांलकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील अभुजमाद भागात ही चकमक पार पडली. (Latest Marathi News)

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ६ वाजता ही चकमक सुरु झाली. टेकमेटा आणि केकूर गावातील जंगलात ही चकमक झाली. या मोहिमेत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि स्पेशल टास्क (STF) यांनी या नक्षलविरोधी मोहिमेत मोठी कामगिरी बजावली. अभुजमाद हा भाग रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरु आहे. (Marathi Tajya Batmya)

या ९ नक्षलवाद्यांमध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून या चकमकीत सुरक्षा रक्षकांना कुठलीही हानी झालेली नाही. पण या नक्षलवाद्यांकडून AK 47 रायफल जप्त करण्यात आल्या आङेत. तसेच इतर स्फोटकं आणि बंदुकीच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या कामगिरीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT