Chhattisgarh Assembly Elections 2023 Mahadev app slaps Congress Know why  Sakal
देश

Chhattisgarh Election: काँग्रेसला महादेव ‘ॲप’ प्रकरण भोवलं; छत्तीसगडमध्ये अशी झाली भाजपची घरवापसी

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारत राज्यात घरवापसी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारत राज्यात घरवापसी केली आहे. ‘भाजपने निर्मिती केली, भाजपच सुधारणा करेल’ अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील जनतेला भाजपला मतदान करण्यासाठी साद घातली होती, त्याला राज्यातील जनतेने प्रतिसाद देत भाजपला पुन्हा सत्ता दिली आहे.

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत म्हणजेच सात आणि १७ नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले होते. आज लागलेल्या निकालांनुसार येथील एकूण ९० जागांपैकी ५५ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे बहुमतासह सत्ता स्थापनेसाठी ४६ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्‍यकता असल्याने भाजप येथे सत्तास्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे.

छत्तीसगडमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणत्याही नेत्याचा चेहरा पुढे न करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील सामूहिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ट नेते रमण सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी येते मेहनत घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी राज्यात प्रचाराचा धडाका लावला होता. त्याचप्रमाणे भाजपने रमण सिंह यांच्या काळातील मंत्र्यांवर विश्‍वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती. आज लागलेल्या निकालावरून जनतेनेही या मंत्र्यांवर विश्‍वास ठेवला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महादेव ‘ॲप’ प्रकरण भोवले

छत्तीसगडमध्ये २०१८मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने येथे संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्याचप्रमाणे मागील वर्षभरापासून भाजपच्या नेत्यांनी, मावळते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

यात सर्वांत गाजलेले प्रकरण म्हणजे महादेव ॲप. बघेल यांनी महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे या माध्यमातून त्यांनी पक्षाला देखील निधी दिला असल्याचा आरोप भाजपकडून आक्रमकपणे करण्यात आला.

याप्रकरणातील आरोपींनी बघेल यांचे नाव उघडपणे घेतल्याने बघेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या निर्मितीचे श्रेय घेत भाजपने छत्तीसगडचा विकास केवळ भाजपच करू शकतो हे येथील जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सनातन धर्माविरोधातील वक्तव्यांना देखील भाजपने येथे प्रचाराचा मुद्दा बनविला होता.

बघेल सरकारमधील १३ मंत्र्यांचा पराभव

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील तब्बल १३ मंत्र्यांना अनपेक्षित निकालांना सामोरे जावे लागले आहे. या १३ जणांपैकी काही मंत्री हे रात्री उशिरापर्यंत पिछाडीवर होते तर काही पराभूत झाले.

हे मुद्दे ठरले निर्णायक

  • आदिवासींचे धर्मांतर केले जात असून त्याला बघेल सरकारचा पाठिंबा असल्याचा भाजपकडून आरोप

  • बघेल सरकारच्या काळात नागरी सेवा परीक्षेत गैरव्यवहार करण्यात आल्याचा आणि सरकारमधील मंत्री, अधिकारी आणि उद्योगपतींच्या जवळच्यांनाच सरकारी नोकरी दिल्याचा आरोप

  • कोळसा गैरव्यवहार तसेच गोधन न्याय योजना, मद्यविक्री धोरण यांत गैरव्यवहाराचा आरोप

प्रमुख विजयी

  • भूपेश बघेल, काँग्रेस (पाटना)

  • कवासी लखमा, काँग्रेस (कोंटा)

  • रमण सिंह, भाजप (राजनांदगांव)

  • अरुण साव, भाजप (लोरमी)

  • विनायक गोयल, भाजप (चित्रकोट)

प्रमुख पराभूत

  • टीएस सिंहदेव, काँग्रेस (अंबिरापूर)

  • महंमद अकबर, काँग्रेस (कवर्धा)

  • शिव डहारिया, काँग्रेस (आरंग)

  • अमरजित भगत, काँग्रेस (सीतापूर)

  • रविंद्र चौबे, काँग्रेस (साजा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT