Chhattisgarh Election eSakal
देश

Chhattisgarh Election: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसताना भाजपला का मिळाली संधी? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये काहीसे आश्चर्यकारक कल पाहिला मिळाले आहेत. कलांनुसार, भाजपने राज्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मोठा धक्का बसला आहे.

कार्तिक पुजारी

रायपूर- छत्तीसगडमध्ये काहीसे आश्चर्यकारक कल पाहिला मिळाले आहेत. कलांनुसार, भाजपने राज्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मोठा धक्का बसला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता.

पण, सध्याच्या कलांनुसार, काँग्रेस पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाचे कारण काय? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.(Chhattisgarh Election Results 2023 cm bhupesh baghel congress and bjp Assembly constituency pm narendra modi brand work in state)

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. अशा परिस्थितीतही भाजपला राज्यामध्ये मुसंडी मारता आली आहे. कलांनुसार, ४५.८४ टक्के मतं भाजपला मिळाली आहेत, तर काँग्रेसला ४१.८२ टक्के मतं मिळाली आहेत. इतरांना ५.७६ टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहेत.

भाजपला संधी कशामुळे?

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ७५ जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. पण, त्यांचा दावा फौल ठरलाय. दुसरीकडे, मोदी ब्रँड पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचं दिसत आहेत. मोदी यांनी राज्यात प्रचारसभांचा धडाका लावला होता. तसेच मुख्यमंत्री बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

भाजपकडून विवाहित गृहिणींना दरवर्षी 12 हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच दोन वर्षात १ लाख रोजगार देण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले. 'मोदी की गॅरंटी'वर लोकांनी विश्वास ठेवल्याचं चित्र आहे. हिंदूमधून ख्रिश्चनमध्ये होणाऱ्या धर्मांतराबाबतही भाजपने रान पेटवलं होतं.

काँग्रेसला का डावललं?

भूपेश बघेल यांनी राज्यात अनेक कल्याणकारी योजना आणल्या होत्या. पण, या योजनांना जनता भुलली नसल्याचं दिसत आहे. भाजपने काँग्रेसच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच रोजगाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं बोललं जातं. निवडणुकीच्या आधी सक्तवसुली संचालनालयाने बघेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

महादेव बेटिंग अॅप प्रकरणीही त्यांच्यावर आरोप झाले होते. यावरुन भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले होते. १.५० लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नियमित करणे, शिक्षक भरती करणे, दारुबंदी इत्यादी आश्वासनं पूर्ण करु न शकल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जातं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT