CM Dhami Sakal
देश

Uttarakhand News: गुन्हेगाऱ्यांमध्ये धाक अन् नागरिकांत विश्वास; धामींनी दिल्या पोलिसांना सुचना

Dhami emphasized enhancing police discipline, controlling crime, and building public trust: गुन्हेगार आणि अपराध्यांमध्ये पोलिसांचा धाक तर सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास टिकून राहणे खूप गरजेचे आहे असे मुख्यमंत्री धामी म्हटले.

सकाळ डिजिटल टीम

CM Dhami: कायदे आणि सुव्यवस्थतेचा आढावा घेत असताना धामी यांनी पोलिस खात्यावर आपली नाराजगी दर्शवलेली आहे. राज्यात रस्त्यावर उघडपणे गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत आशा प्रकारच्या घटनांना लगाम लावणे गरजेचे आहे, असे धामी म्हणाले. गुन्हेगार आणि अपराध्यांमध्ये पोलिसांचा धाक तर सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास टिकून राहणे खूप गरजेचे आहे असेही ते म्हटले. आधी दर शुक्रवारी पोलिसांची परेड होत होती परंतु आता ती होत नाही त्यामुळे पोलिस खात्यामध्ये सुद्धा शिस्त असणे गरजेचे झाले आहे.

पोलिस खात्यातील उच्च अधिकाऱ्यांसोबत धामी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेण्यात आली. रात्रीच्या वेळेस गस्त घालणे, कामगार महिला वर्ग व इतर महिलांना गौरा शक्ती ॲपद्वारे जोडण्याचे काम करण्यात यावे तसेच रात्रीच्या वेळेस प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात यावी अशा कार्यावर जास्तीत जास्त भर दिला जावा असे निर्देश देखील धामी यांनी पोलिस खात्याला दिले आहे.

धामी पुढे म्हटले, राज्याच्या सीमा भागात गस्त घालून सतत ये-जा करत असलेल्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात यावी जेणेकरून बाहेरील देशाच्या गुलामीचा उत्तराखंड शिकार होणार नाही. मद्रासी व इतर आणखी शिक्षणसंस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना राज्यातील एक सुसंस्कृत नागरिक कसे घडवले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे असून यावर ही लक्ष केंद्रीत करावे. राज्यात होणारे धर्मांतर व लव जिहाद यांसारख्या घटनांवर प्रतीबंध लावण्यासाठी कायद्यानुसार सक्त कारवाई केली जाईल, असे देखील मुख्यमंत्री धामी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सुधारण्याचे, माहिती त्वरित पोहोचवण्याचे आणि इंटेलिजेंस प्रणाली अधिक प्रभावी बनवण्याचे निर्देश दिले. त्यांनी रात्री पेट्रोलिंगची व्यवस्था मजबूत करण्यावरही जोर दिला. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना कोणतीही अपराधिक घटना वेळेवर माहिती देण्याचे आणि ती माहिती तात्काळ महानिदेशकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत सीएस राधा रतूडी, प्रमुख सचिव आरके सुधांशु, गृह सचिव शैलेश बगौलीसह इतर अधिकारी उपस्थित होते.

डेमोग्राफिक मधील झालेला बदल

राज्यात कुठे गुन्हेगारी वाढत आहे यावर नजर ठेवावी. त्यांनी डेमोग्राफिकमधील बदलांची समस्येवर लवकरच संबंधील ऐजेंसीद्वारे नजर ठेवण्याचे आदेश देखील दिले आहेत.

सरळ व्यवहार ठेवावा

मुख्यमंत्र्यांनी तक्रारींचे लवकर निवारण आणि अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद समंजक असावा, असे सांगितले. त्यांनी क्षेत्रीय भेदभाव न करता काम करण्यावर जोर दिला जावा, असे ते म्हटले. सायबर गुन्हे कमी करण्यासाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावी बनवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT