कोलकता : आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावर १८ टक्के जीएसटी लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मागे घेण्याची मागणी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सीतारामन यांना पत्र पाठवीत आयुर्विमा, आरोग्य विम्यावरील जीएसटी मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर बॅनर्जी यांनीही यासंदर्भात सीतारामन यांना पत्र पाठविले.
पत्रात त्यांनी म्हटले आहे, की अकाली मृत्यू, अपघात, आजारपण आदी अनपेक्षित संकटावेळी आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे, हा आयुर्विमा व आरोग्य विम्याचा मुख्य हेतू आहे. मात्र, या विम्यावर सुमारे १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे,
हे मी अतिशय खेदाने नमूद करत आहे. त्याचप्रमाणे, नव्या करप्रणालीत प्राप्तिकर कायदा ८० सी आणि ८० डी नुसार आरोग्य विमा व आयुर्विम्यासाठी असलेली वजावटही मागे घेण्यात आली आहे. हा निर्णय लोकविरोधी असून या विम्यावर १८ टक्के जीएसटी लागू केल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. या अतिरिक्त करामुळे अनेकांना नवीन विमा पॉलिसी घेणे किंवा सध्याची पॉलिसी पुढे सुरू ठेवणे अवघड झाले. या लोकविरोधी करधोरणांचा आढावा घेऊन आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हफ्त्यावर लावलेला १८ टक्के जीएसटी मागे घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.