India vs China esakal
देश

ड्रॅगनचा विळखा... चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावं बदलली

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि चीनमध्ये तणाव कायम असून हा तणाव कमी होण्याचं नाव घेत नाहीय.

भारत (India) आणि चीनमध्ये (China) तणाव कायम असून हा तणाव कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आता चीननं पुन्हा एकदा भारताला भडकवण्याचं काम केलंय. चीननं अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) अनेक ठिकाणांची नावं बदलली असून या ठिकाणांना 'चिनी' शब्दांत नाव देण्यात आली आहेत, त्यामुळं भारत-चीन वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

चीननं 15 ठिकाणांची बदलली नावं

ग्लोबल टाइम्सच्या अहवालात म्हटलंय, की चीनच्या नागरी मंत्रालयानं नियमांनुसार, चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट (South Tibet) किंवा जंगनान म्हणत आहे. चायनीज अक्षरांत ही नाव देण्यात आली आहेत. ज्या 15 ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत, ती भारतातील अरुणाचल प्रदेशचा भाग आहे. 15 बदललेल्या नावांपैकी आठ निवासी ठिकाणं, चार पर्वत, दोन नद्या आणि एक पर्वतीय खिंड आहे. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना चिनी नावं देण्याचं काम दुसऱ्यांदा चीननं केलंय. याआधी 2017 मध्ये चीननं सहा ठिकाणांना स्वत:चं नाव दिलं होतं.

चीननं शन्नान प्रीफेक्चरच्या कोना काउंटीमधील सॉन्गकोझोंग आणि डग्लुंगझोंग, न्यिंगचीच्या मेडोग काउंटीमधील मणीगंग, ड्यूडिंग आणि मिगपेन, न्यिंगचीच्या जिऊ काउंटीमधील गोलिंग, शन्नान प्रांतातील लुंजे काउंटीमधील दंबा आणि मोझाग यांची नावं बदलली आहेत.

China

अरुणाचल प्रदेशला चीन भारताचा भाग मानत नाही

बीजिंगमधील (Beijing) चायना तिबेटोलॉजी रिसर्च सेंटरचे (China Tibetology Research Center) तज्ज्ञ लियान जियांगमिन (Lian Jiang Min) यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितलं की, ही घोषणा शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या ठिकाणांच्या नावांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणाचा भाग आहे. त्यांना प्रमाणित नाव देणं हे एक कायदेशीर पाऊल आणि चीनचं सार्वभौमत्व आहे. भविष्यात प्रदेशात अधिक प्रमाणित ठिकाणांची नावं जाहीर केली जातील, असं लियान म्हणाले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं फेब्रुवारी 2020 मध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, की चीन सरकारनं तथाकथित अरुणाचल प्रदेशला कधीही मान्यता दिली नाही, त्यामुळं हा भाग भारताचा म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT