Sujeet Kumar Google file photo
देश

भारतीय खासदाराला चीनची धमकी

तैवान हा एक चीनी अधिपत्याखालील प्रांत असल्याचा चीनचा मुत्सद्दी, राजकीय दावा असून, तैवान मात्र आपण स्वतंत्र राष्ट्र असल्याचा तैवानचा दावा आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

तैवान हा एक चीनी अधिपत्याखालील प्रांत असल्याचा चीनचा मुत्सद्दी, राजकीय दावा असून, तैवान मात्र आपण स्वतंत्र राष्ट्र असल्याचा तैवानचा दावा आहे.

नवी दिल्ली : तैवानच्या (Taiwan) कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, अशी थेट तंबी देत चीनने बीजू जनता दलाचे (BJD) राज्यसभा खासदार सुजित कुमार (Sujeet Kumar) यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तैवान आणि इंडो-पॅसिफिक देशांतील संबंध मजबूत व्हावेत यासाठी बहुराष्ट्रीय आंतरसंसदीय व्यासपीठ (Indo-Pacific transnational interparliamentary platform) निर्माण करण्यात आला आहे. या व्यासपीठाच्या फॉर्मोसा क्लबच्या (Formosa Club) ऑनलाईन संस्थापन सोहळ्यासाठी खासदार सुजित कुमार उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सुजित कुमार यांना नवी दिल्लीच्या चिनी दूतावासातील वकील लिऊ बिंग यांनी आठ मे रोजी एक पत्र लिहून क्लबमधून माघार घेण्यास सांगितले. (China sends letter to Indian BJD leader Sujeet Kumar over Taiwan)

सुजित कुमार यांचे या क्लबमधील सदस्यत्व चीनबद्दलच्या भारतीय धोरणाच्या विरोधात असल्याचे लिऊ बिंग यांनी म्हटले आहे. सुजित कुमार ओडिशा मधून बिजू जनता दलाचे राज्यसभेतील खासदार आहेत.

फॉर्मोसा क्लबला 'बेकायदेशीर असेंब्ली' असे लिऊ बिंग यांनी म्हटले आहे. तुमची तेथील उपस्थिती ही भारत सरकारच्या चीन धोरणाच्या विरुद्ध आहे. ज्या धोरणाचे पालन करण्याचे भारताने वचन दिले आहे आणि म्हणूनच तुम्ही चूक दुरुस्त केली पाहिजे, असेही ते म्हणतात. तैवान हा एक चीनी अधिपत्याखालील प्रांत असल्याचा चीनचा मुत्सद्दी, राजकीय दावा असून, तैवान मात्र आपण स्वतंत्र राष्ट्र असल्याचा तैवानचा दावा आहे.

फॉर्मोसा क्लबच्या स्थापना समारंभास ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपिन्स आणि फिजी यासह 17 देशांचे खासदार आणि प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातील सुजित कुमार हे एकमेव प्रतिनिधी होते. सुजीत हे बर्‍याच काळापासून चीनच्या भारतविरोधी धोरणाला विरोध करीत आहेत आणि तिबेट आणि तैवानला विविध मुद्द्यांवरून पाठिंबा देत आहेत. या पत्रामुळे चीनने त्यांच्यावर बारीक नजर ठेवली असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोविड संकट आणि ऑक्सिजन आणीबाणीच्या वेळीही चीन भारताचे समर्थन करत असल्याचे सांगत लियू बिंग यांनी सुजित कुमार यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कार्यक्रमात सुजित कुमार म्हणाले होते की तैवान आणि भारत लोकशाही, मानवाधिकार आणि कायद्याचे नियम या सारख्या समान मूल्यांचा पुरस्कार करतात. मला खात्री आहे की फॉर्मोसा क्लबचा ताजा अध्याय तैवानचे उर्वरित इंडो-पॅसिफिक देशांशी मैत्री वाढविण्यात मदत करेल. तसेच मला आशा आहे की तैवानच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचा विस्तार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT