Mani Shankar Aiyar 
देश

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांच्या ताज्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले असून भाजपने यावरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तवावरुन स्वत:ला वेगळं केलं आहे.

१९६२ च्या इंडो-चायना युद्धामध्ये चीनने 'कथितरीत्या' भारताचा भाग बळकावला, असं अय्यर म्हणाले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ('Nehru's First Recruits') एका पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यासंदर्भातील एक व्हिडिओ भाजपकडून व्हायरल केला जात असून याला राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे.

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मणिशंकर अय्यर यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. 'त्यांनी चुकून तो शब्द वापरला. जास्त वयामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली. पण, काँग्रेस पक्षाचा त्यांचा मूळ वक्तव्याशी कोणताही संबंध नाही;, असं जयराम रमेश म्हणालेत.

वादाला सुरुवात झाल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली आहे. चीनच्या आक्रमणासंबंधात मी चुकीने 'कथित' या शब्दाचा वापर केला. त्याबाबत मी प्राजंळपणे माफी मागतो, असं ते म्हणाले. त्यांच्या माफीनंतर देखील भाजपच्या नेत्यांचे समाधान झालेले दिसत नाही. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.

अय्यर यांचे वक्तव्य राजकारणाला भरकटवण्याचा प्रयत्न आहे. नेहरुंनी संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरुपी सदस्यत्वाचा दावा चीनला देऊन टाकला. राहुल गांधींनी पाकिस्तानसोबत गुप्त करार केला आहे. त्यांच्या संस्थेला चीनकडून निधी मिळतो. काँग्रेसने चिनी वस्तूंना मुक्तद्वार दिले. आता काँग्रेस नेते अय्यर चीनच्या आक्रमणालाच नाकारू पाहात आहेत. चीनने भारताचा ३८००० स्क्वेअर किमी भूभाग बळकावला आहे हे सत्य आहे, असं मालविया म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

IND vs PAK: भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, पण कर्णधार हरमनप्रीतला दुखापत

SCROLL FOR NEXT