Citizens attacked the car of BJP MP D Arvind in Telangana esakal
देश

तेलंगणात भाजप खासदाराच्या गाडीवर हल्ला; समर्थक-ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी

भाजप खासदार समर्थकांमध्ये आणि काही ग्रामस्थांमध्ये हाणामारी झालीय.

सकाळ डिजिटल टीम

भाजप खासदार समर्थकांमध्ये आणि काही ग्रामस्थांमध्ये हाणामारी झालीय.

करीमनगर : तेलंगणात पावसानं (Telangana Heavy Rain) प्रभावित झालेल्या गावाला भेट देण्यासाठी आलेल्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार डी. अरविंद (D. Arvind) यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, या लोकांनी खासदाराची गाडी अडवली आणि तोडफोड केली. यावरून खासदार समर्थक आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाचीही झाली.

या घटनेसाठी भाजप खासदारानं (BJP MP) तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला (TRS) जबाबदार धरलंय. त्याचवेळी मागणी पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. भाजप खासदार डी. अरविंद यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली, ते जगतियाल जिल्ह्यात (Jagtial District) मुसळधार पावसानंतर गाव आणि गोदावरी नदीच्या (Godavari River) पाणी पातळीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. एरदांती गावात पोहोचल्यावर काही लोकांनी त्यांचा ताफा अडवला आणि खासदारांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'यावेळी भाजप खासदार अरविंद यांच्या समर्थकांमध्ये आणि काही ग्रामस्थांमध्ये हाणामारी झाली. गावातील लोक अनेक दिवसांपासून पावसाळ्यात आश्रय घेण्यासाठी निवारा बांधण्याची मागणी करत आहेत. मात्र, वेळ उलटून गेला तरी त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं ते नाराज आहेत.' मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारीही एका स्थानिक आमदाराला गावकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं होतं. भाजप खासदार अरविंद यांनी या हल्ल्यामागं सत्ताधारी टीआरएसचा हात असल्याचा दावा केलाय. या घटनेनंतर त्यांनी ट्विट करून आरोप केला की, 'टीआरएसकडून माझ्यावर आणखी एक भ्याड हल्ला. पूरग्रस्त भागातून लोक मदतीसाठी आवाहन करत आहेत आणि टीआरएस सरकारला माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याची योजना आखण्याची वेळ आली आहे!' दरम्यान, काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT