Dhananjaya Chandrachud  sakal
देश

D.Y. Chandrachud: "सरकारने लोकांना..."; डिजिटल युग अन् आव्हानांबद्दल DY चंद्रचूड यांचे महत्वाचे विधान

सकाळ वृत्तसेवा

D.Y. Chandrachud : ‘‘सरकारने लोकांना त्यांची ओळख निर्माण होऊ देणे आणि त्यांची दखल घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या तक्रारी मांडण्याची, अधिकारांची मागणी करण्याची क्षमता नागरिकांमध्ये निर्माण होणे आणि त्यांना त्यासाठी मार्ग उपलब्ध असणे, यामध्ये या दखल घेण्याचा मोठा वाटा असतो,’’ असे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज व्यक्त केले.

आशिया-प्रशांत भागातील वकील, न्यायाधीश, विधी सल्लागार संघटना यांच्या ‘लावासिआ’ या संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेत न्या. चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले,‘‘स्वत:ला काय हवे त्याची निवड करण्याचे आणि आपल्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याची पात्रता म्हणजे स्वातंत्र्य होय. व्यक्तीची ओळख ही त्याने केलेल्या निवडीतून स्पष्ट होते. एक वकील म्हणून आपल्याला कायमच सरकारची भूमिका आणि लोकांचे निवडीचे स्वातंत्र्य याबाबत समतोल साधावा लागतो."

चंद्रचूड म्हणाले, "सरकार आणि स्वातंत्र्य यांच्यातील संबंधाची व्याख्या बऱ्यापैकी स्पष्ट असली तरीही, ओळख आणि स्वातंत्र्य यांच्या संबंधाबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही. निवड करण्याच्या लोकांच्या स्वातंत्र्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसणे, याला स्वातंत्र्य म्हणतात. (Latest Marathi News)

"मात्र, अनेकवेळा मोठा समुदाय किंवा आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर दुर्लक्षित घटकांच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष होते आणि सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही. या दुर्लक्षित घटकांवर अनेक पिढ्यांपासून अन्याय होत असल्याने इतर सामाजिक घटक बलशाली बनतात. त्यामुळे अशा घटकांची ओळख निर्माण होऊ देणे आणि त्यांची दखल घेणे आवश्‍यक आहे,’’ असे न्या. चंद्रचूड  म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawade video: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT