Rajeev Chandrasekhar sakal
देश

Rajeev Chandrasekhar : राजीव चंद्रशेखर कार्यरत राहणार;निवृत्तीच्या पोस्टवरून चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेल्या भाजपच्या राजीव चंद्रशेखर यांची पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

सकाळ वृत्तसेवा

तिरुअनंतपुरम : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेल्या भाजपच्या राजीव चंद्रशेखर यांची पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. रंजन यांनी रविवारी केलेल्या पोस्टमध्ये राजकीय जीवनातून निवृत्ती घेण्याबद्दलचे सूतोवाच केले होते. मात्र त्यांनी काही वेळातच ही पोस्ट डिलीट केली.

मंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्याबद्दल संबंधित पोस्ट केली होती, अशी सारवासारव चंद्रशेखर यांनी केली. इतकेच नव्हे तर, ‘‘माझ्याकडे पुढील १०० दिवसांचा कृती आराखडा असून, पंतप्रधान मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मी तातडीने मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी काम सुरू करणार आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

या पोस्टमुळे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री असलेल्या राजीव चंद्रशेखर यांनी रविवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत निवृत्तीचे संकेत दिले. ‘‘मागील १८ वर्षांपासून सुरू असलेल्या माझ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाला आता विराम मिळाला आहे. थांबण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता पण पराभवाचे वास्तव स्वीकारायला हवे’’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. ‘‘मोदी सरकार २.०मध्ये मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो,’’ असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

थरूर यांच्याकडूनही प्रोत्साहन

निवृत्तीचे संकेत देणाऱ्या राजीव चंद्रशेखर यांच्या पोस्टवर त्यांचे लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांनीही त्यांना प्रोत्साहन देणारी पोस्ट लिहिली आहे. ‘‘देशातील जनतेच्या सेवेसाठी निवडणूक जिंकून लोकप्रतिनिधी होणे हा केवळ एक मार्ग झाला, देशसेवेचे असे अनेक मार्ग आहेत. मागील सरकारमध्ये तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात तुमच्याशी अनेक विषयांवर चर्चा करणारी एक व्यक्ती या नात्याने मी हे सांगू शकतो की, तुम्ही देशाच्या विकासात आणखीही योगदान देऊ शकता यात काहीच शंका नाही. इतकेच नव्हे तर तुमचे वय तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करू शकता.’’ असे थरूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT