Wayanad landslides sakal
देश

Wayanad landslides : नवव्या दिवसानंतरही अद्याप दीडशे बेपत्ता ; वायनाडमध्ये शोधकार्याची पराकाष्ठा,भीषण दृश्‍य पाहिल्याने मनोधैर्यावर परिणाम शक्य

वायनाडच्या भूस्खलन भागात आज नवव्या दिवशी बचाव आणि मदत कार्य सुरू राहिले. हवाई दल, लष्कर आणि राज्य कर्मचाऱ्यांकडून शोधकार्याची पराकाष्ठा केली जात असून बुलडोझर, अर्थ मूव्हर्स चालविणाऱ्या चालकांच्या मनौधैर्यावर सततच्या कामांमुळे परिणाम होण्याची शक्यता गृहित धरली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

वायनाड (केरळ) : वायनाडच्या भूस्खलन भागात आज नवव्या दिवशी बचाव आणि मदत कार्य सुरू राहिले. हवाई दल, लष्कर आणि राज्य कर्मचाऱ्यांकडून शोधकार्याची पराकाष्ठा केली जात असून बुलडोझर, अर्थ मूव्हर्स चालविणाऱ्या चालकांच्या मनौधैर्यावर सततच्या कामांमुळे परिणाम होण्याची शक्यता गृहित धरली जात आहे. भीषण दृश्‍याने विचलित होऊ नये यासाठी चालकांचे राज्य सरकारकडून समुपदेशन केले जात आहे. सलग नवव्या दिवशी मोहीम राबवूनही अद्याप दीडशे नागरिक बेपत्ता आहेत. दरम्यान, दुर्गम भागात तपासाची व्याप्ती वाढविण्यासाठी हवाई दलाने एका विशेष मोहिमेद्वारे जवानांच्या एका पथकाला कलपेट्टा येथून चलियार नदी किनाऱ्यावर सोडले आणि त्यांनी मोहीम सुरू केली. वायनाडच्या चुरलमला, मुंडक्कई येथे ३० जुलै रोजी प्रचंड भूस्खलन झाल्याने ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचीही अपरिमित हानी झाली आहे.

आज सकाळी सहा प्रशिक्षित जवान, केरळ पोलिसांचे चार एसओजी (विशेष अभियान गट), दोन वनाधिकारी आणि एक श्‍वानपथकाचा समावेश असलेले विशेष पथक आज वायनाडच्या सुजीपारा सरोवराच्या सनराईज खोऱ्याकडे रवाना झाले. हे तेरा जणांचे पथक असून बेपत्ता लोकांचा शोधासाठी जमिनीत खोलवर जाण्याची इच्छा असल्याचे एसओजीचे पोलिस अधीक्षक तपोश बसुमतारी यांनी सांगितले. काल चार किलोमीटरपर्यंतच्या भागात तपास करण्यात आला. आजही आणखी काही भागांत शोध मोहिम राबवू, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागांतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून केरळकडून प्रस्तावित पुनर्विकास योजना ही देशासमोर, जगासमोर आदर्शवत असेल, अशी ग्वाही दिली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारी कर्मचारी आपल्या वेतनाचा काही भाग मदतनिधीत जमा करत आहेत. ३० जुलैपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीत ५३.९८ कोटी रुपये जमा झाले असल्याची त्यांनी माहिती दिली. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते ए.के. अन्टोनी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ५० हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी त्यांनी वायनाडच्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. माजी संरक्षण मंत्री ए.के. अन्टोनी म्हणाले, आपण सध्या मोठी रक्कम देण्याच्या स्थितीत नाही, परंतु सीएमडीआरएफला ५० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. खासदार असताना महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत केली हेाती, असेही त्यांनी सांगितले. वायनाडचे भूस्खलन हे दक्षिण राज्याच्या इतिहासात मोठे संकट ठरले आहे. राजकारण आणि अन्य मतभेद विसरून सर्वांनी नैसर्गिक संकटाने उध्ववस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. भूस्खलनात किती मृत्युमुखी पडले, याचा निश्‍चित आकडा आताच सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे वेगाने पुनर्वसन करायला हवे, असे ॲन्टोनी म्हणाले.

मोठी वाहने चालवणाऱ्यांचेही समुपदेशन

उत्तर केरळच्या वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनातून वाचलेल्या लोकांना आणि मृतांच्या नातेवाईकांनाच नाही तर घटनास्थळी काम करणाऱ्या अर्थ मुव्हर्स, बुलडोझरसारखे वाहने चालविणाऱ्या चालकांनाही राज्य सरकारकडून समुपदेशन केले जात आहे. त्यांचे मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी काम केले जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मानसशास्त्रीय विभाग मशिन ऑपरेटर्सना मानसिक आरोग्यविषयक सल्ला देण्याचे काम करत आहे. भूस्खलनग्रस्त भागात सतत काम केल्याने आणि डोळ्यांसमोर सतत भीषण दृश्‍य दिसत असल्याने मशिन ऑपरेटर्सच्या मनावर सखोल परिणाम होऊ शकतो किंवा मानसिक धक्का बसू शकतो. यावर मात करण्यासाठी समुपदेशन केले जात आहे. बिहार, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि कर्नाटकसारख्या राज्यांसह तीनशेहून अधिक मशिन ऑपरेटर काम करत असून त्यांना विविध भाषेत संवाद साधला जात आहे.

मृतांची संख्या ४१३ वर, १५२ बेपत्ता

वायनाडमध्ये मृतांची संख्या ४१३ वर पोचली असून अजूनही दीडशे नागरिकांचा शोध लागलेला नाही. मलप्पुरम जिल्ह्यातील नीलांबूर आणि परिसरातील चलियार नदीतून आतापर्यंत ७६ मृतदेह सापडले शिवाय अवयव आढळून आले आहेत. आजही चलियार नदीच्या परिसरात बचाव मोहीम राबविण्यात आली. नदीच्या परिसरातील शिक्षण संस्थांत शंभराहून मदत छावण्या उभारल्या असून तेथे १०,३०० जण राहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT