Rajasthan Congress Committee esakal
देश

मोदी लाटेमुळंच काँग्रेसचं सरकार गेलं; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

सकाळ डिजिटल टीम

'सदस्यांसह कर्मचाऱ्यांच्या नाराजीमुळं पहिल्यांदाच आपण निवडणूक हरलो.'

एआयसीसीच्या वतीनं राजस्थान काँग्रेस कमिटीचं (Rajasthan Congress Committee) खुलं अधिवेशन राजधानी जयपूरच्या बिर्ला सभागृहात (Birla Hall, Jaipur) सुरूय. आज (रविवार) अधिवेशनाचं (Congress Convention) दुसरं सत्र आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सीएम गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी सरकार कोसळण्याची कारणं सांगितली. गेहलोत म्हणाले, सदस्यांच्या नाराजीमुळं आणि मोदी लाटेमुळं (Modi Government) यापूर्वी काँग्रेसचं सरकार (Congress Government) गेलं होतं. 2003 च्या विधानसभा निवडणुकीत सदस्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं.

राजस्थानात 2003 मध्ये कामगारांचा संप बराच काळ चालला होता. याचा सत्ताधारी काँग्रेसला निवडणुकीत फटका बसला. 1998 च्या निवडणुकीत 153 आमदारांच्या पाठिंब्यानं सत्तेवर आलेलं गेहलोत सरकार 2003 च्या निवडणुकीत 56 जागांवर घसरलं. सीएम गेहलोत (CM Gehlot) पुढे म्हणाले, सदस्यांसह कर्मचाऱ्यांच्या नाराजीमुळं पहिल्यांदाच आपण निवडणूक हरलो. मोदी लाटेमुळं दुसऱ्यांदा सरकार गेलं. यावेळी आम्ही अशा योजना आणल्या, ज्याचा थेट फायदा जनतेला झाला. राजस्थान पूर्णपणे बदलेलं आहे, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

काँग्रेस 153 वरून 56 जागांवर घसरली

कर्मचाऱ्यांच्या चौफेर आंदोलनाचा परिणाम 2003 च्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला होता. तब्बल दोन वर्षे चाललेला संप आणि निदर्शनानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सरकार स्थापन करता आलं नाही. 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांनी 153 आमदारांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं, परंतु 2003 च्या निवडणुकीत 56 जागांवर काँग्रेसचा प्रवास संपला. 1998 च्या तुलनेत या निवडणुकीत भाजपला 87 जागांची आघाडी मिळाली. भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आलं आणि वसुंधरा राजे (Vasundhara Raje) राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT