CM Eknath Shinde demand Shiv Sena chief Balasaheb Thackeray picture in new Parliament building  esakal
देश

नवीन संसद भवनात शिवसेनाप्रमुखांचे चित्र लावण्याची CM शिंदेंची मागणी

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - राजधानीतील नवीन संसद भवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावावे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतरीत्या विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यन नवीन महाराष्ट्र सदनाच्या परिसरातही बाळासाहेबांचा पुतळा उभारावा या मागणीने जोर धरला आहे. हा परिसर महाराष्ट्र सरकारच्याच अखत्यारीत येत असल्याने राज्यातील वर्तमान सरकारकडून याबाबत तातडीने कार्यवाही सुरू होण्याची शक्यता सदनाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

सदनाच्या परिसरात पुतळा बसविण्याचा निर्णय झाल्यास डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या आसपास, दर्शनी भागात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाऊ शकतो अशाही हालचाली आहेत. कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या लॉबी भागात राजर्षी शाहू महाराज, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे सध्या आहेत. बाळासाहेबांचा पुतळा सदनात उभारावा याबाबतचे निवेदन शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांचेही छायाचित्र लावण्यात यावे या संदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून यासंदर्भात निवेदन देणार आहोत असेही शिंदे यांनी सांगितले.

या मागणीबाबत पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील, असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नवीन संसद भवनातील ‘राज्यघटना कक्षा‘मध्ये सध्याच्या सेंट्रल हॉलच्या धर्तीवर महापुरुषांची छायाचित्रे लावली जाणार का, याबाबतचा कोणताही निर्णय पंतप्रधानांनी अद्याप घेतलेला नाही. महाराष्ट्र सरकारकडून होणाऱया या मागणीनंतर याबाबतची चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत. नवीन संसद भवनाचे काम अभूतपूर्व वेगाने सुरू असून याच वर्षीचे हिवाळी अधिवेशन नवीन संसदेत भरविण्याचा निर्धार मोदी सरकारने व्यक्त केला आहे. मात्र या इमारतीची भव्यता, आतील बारीकसारीक कामे व सध्याची कामाची प्रगती पाहता नवीन संसदेत प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याचा हा ‘मुहूर्त' पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतही लांबू शकतो अशीही सचिवालय परिसरातील चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा, यावर राधाकृष्ण विखे म्हणाले... सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम

Ziro Valley Tourism : भारतातल्या या ठिकाणाचं नावं आहे झिरो, जाणून घ्या का खास आहे हे शहर

Latest Marathi News Live Updates : अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात भीषण आग

अनंत-राधिकाच्या लग्नात येण्यासाठी कलाकारांना पैसे दिले गेले? अनन्या पांडेने सांगितलं सत्य, म्हणते-

IND vs BAN 1st Test Live : Rohit Sharma ६ धावांवर, शुभमन गिलचा भोपळा; २४ वर्षीय गोलंदाजाने भारताला दिले धक्के

SCROLL FOR NEXT