Mamata Banerjee_Jaydeep Dhankad 
देश

ममतांनी ट्विटरवर केलं ब्लॉक; राज्यपाल म्हणतात, 'मी तर एकही ट्विट...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्याचे राज्यपाल यांच्यामधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. हे प्रकरण आता ट्विटरवर ब्लॉक करण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड (Jaydeep Dhankad) यांना थेट ट्विटरवर ब्लॉकच केलं होतं. राज्यपालांच्या ट्विट्समुळं वैतागून आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर आता राज्यपालांचंही उत्तर आलं आहे. (WB Governor Jagdeep Dhankhar)

राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटलंय की, माध्यमे मुख्यमंत्र्यांना (ममता बॅनर्जींना) प्रश्न विचारत नाहीत, हे फारच दुर्दैवी आणि लोकशाहीसाठी आव्हान आहे. त्यांनी जे विधान केलंय त्याच्यात जराही तथ्य नाही. राज्यपाल दररोज त्यांच्याविरोधात ट्विट करतात, असा क्रूर आरोप त्यांनी केला आहे. मी याप्रकारचं एकही ट्विट कधी केलं नाहीये.

ममतांचा आरोप काय?

ममतांनी राज्यपाल धनखड यांच्यावर आरोप करताना सांगितलं होतं की, राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना (डीजीपी) धमकावण्याचं काम करत होते. ममतांनी असाही आरोप केला की, राज्यपाल धनखड ट्विट्सच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं धमकावत होते की, जसे ते त्यांचे बिगारी कामगार आहेत.

राज्य सरकारवर राज्यापलांची सातत्यानं टीका

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधत आहेत. नुकतंच त्यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप लावला. त्यांनी माँ कॅन्टिन आणि कोरोना महामारीच्या काळात केल्या गेलेल्या नियोजनात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच राज्यपालांनी ममतांच्या सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, राज्य सरकार बंगालमधील लोकशाहीला गॅसच चेंबर बनवलं आहे. या राज्यात लोकशाहीचा श्वास कोंडतो आहे. इथं कायद्याचं राज्य नव्हे तर राज्यकर्त्याचा कायदा आहे. इथलं राजकारण रक्तरंजित झालं असून संविधानाची रक्षा करणं माझं कर्तव्य आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे आपण अनेकदा पत्र लिहून राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती, पण यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. (Mamata blocks governor on Twitter Made serious allegations)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT