cm mamata banerjee says bengali language should be classical language Sakal
देश

Mamata Banerjee : बंगाली भाषेला अभिजात दर्जा मिळावा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बंगाली ही प्राचीन काळापासूनची अभिजात भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या संशोधनाचा अहवालही बॅनर्जी यांनी पत्राबरोबर जोडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असून तसे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. बंगाली ही प्राचीन काळापासूनची अभिजात भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या संशोधनाचा अहवालही बॅनर्जी यांनी पत्राबरोबर जोडला आहे.

‘‘बंगाली भाषेच्या प्राचीनतेवर नेहमीच दावा केला जात होता; परंतु त्याला दुजोरा देणारे ठोस संशोधन झालेले नव्हते. इसवी सनापूर्वी तिसऱ्या व चौथ्या शतकापासून बंगाली लिखित स्वरूपात अस्तित्वात होती.

यासंदर्भतील संशोधनावर आधारित ठोस पुरावे मी पत्रासह जोडत आहे,’’ असे ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे. पुरातत्त्व संशोधन, शिलालेख, प्राचीन संस्कृत आणि पाली ग्रंथांमधील संदर्भांचे पुरावे आणि सातव्या शतकापूर्वीचे बंगाली साहित्य यातून तिचा अभिजात वारसा सिद्ध होतो, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT