Chief Minister Nitish Kumar politics esakal
देश

Nitish Kumar : नितीश कुमार नाराज? बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही; अर्थमंत्री म्हणाले...

Bihar Politics : सम्राट चौधरी पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुख्यमंत्रीसुद्धा सातत्याने विशेष दर्जा मिळावा, यासाठी आग्रही आहेत. विशेष दर्जाच्या मुद्द्यावर बोलणं त्यांनी टाळलं. ते म्हणाले, एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारने बिहारला सातत्याने मदत करण्याचं काम केलेलं आहे. मग ते अटलजींचं सरकार असो की मोदींचं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

संतोष कानडे

Bihar Special State Status : बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी जेडीयू नेते सातत्याने मागणी करत होते. परंतु केंद्राकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाला एकप्रकारे फायनल उत्तर मिळालं असून बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

झंझापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामप्रीत मंडल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अर्थराज्यामंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लिखित उत्तरात म्हटलं की, बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळू शकत नाही. एनडीसीच्या वतीने मागच्या काही वर्षांमध्ये काही राज्यांना विशेष दर्जा मिळाला होता.ज्या राज्यांना विशेष दर्जा मिळाला आहे, ते राज्य संबंधित निकषांवर बसत होते, असं लेखी उत्तरात म्हटलं आहे.

भाजपकडून मोठं विधान

बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा, या मागणीसाठी उपमुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनी सोमवारी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, बिहारला आर्थिक मदतीची गरज आहे. आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे तसा आग्रह केलेला आहे. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल.

सम्राट चौधरी पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुख्यमंत्रीसुद्धा सातत्याने विशेष दर्जा मिळावा, यासाठी आग्रही आहेत. विशेष दर्जाच्या मुद्द्यावर बोलणं त्यांनी टाळलं. ते म्हणाले, एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारने बिहारला सातत्याने मदत करण्याचं काम केलेलं आहे. मग ते अटलजींचं सरकार असो की मोदींचं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

केंद्र सरकारच्या या लेखी उत्तरामुळे बिहारचे मुख्यमंत्री नाराज होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांच्या नजरा नितीश कुमारांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT