Pregnancy Test CID Inquiry esakal
देश

मोठी बातमी! दोन वर्षांत तब्बल एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या; मुख्यमंत्र्यांनी दिले CID चौकशीचे आदेश, सहभागी डॉक्टरची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

म्हैसूर आणि मंड्या येथे घडलेली भ्रूण हत्या प्रकरणे समाजासाठी मोठी बदनामी होती. एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या झाली आहे.

बंगळूर : राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या गर्भलिंग चाचणी (Pregnancy Test) आणि भ्रूणहत्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने सीआयडीवर (CID Inquiry) सोपविली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. तसेच गृहराज्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर (G Parameshwar) यांनी फोनवरून माहिती दिली आहे.

गेल्या आठवडाभरापासून गर्भलिंग चाचणी आणि भ्रूणहत्येचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. म्हैसूर आणि मंड्या येथे घडलेली भ्रूण हत्या प्रकरणे समाजासाठी मोठी बदनामी होती. एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या झाली आहे.

प्राथमिक तपासात पोलिसांना म्हैसूरचे आयुर्वेदिक डॉ. चंदन बल्लाळ आणि त्यांच्या टीमने अवघ्या तीन महिन्यांत २४२ स्त्रीभ्रूण हत्या केल्याची कागदपत्रे, पुरावे सापडले आहेत. दोन वर्षांत एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या झाल्याची शक्यता आहे. निरीक्षक प्रशांत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उदयगिरी (म्हैसूर) येथील आयुर्वेदिक डे केअर सेंटरवर छापा टाकून रुग्णालयाला टाळे ठोकले.

रुग्णालयाचे मालक डॉ. चंदन बल्लाळ यांनी मशिन्स वाताहात लावत कागदपत्रे नष्ट केली होती. त्यानंतर चंदनच्या घराची झडती घेतली असता रुग्णालयातील रजिस्ट्रर सापडले. ज्यामध्ये सर्व तपशील मिळाला. संघटित नेटवर्कद्वारे गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रुपये निश्चित केले होते. गुन्ह्यात सहभागी असलेले डॉ. चंदन बल्लाळ, डॉ. तुलसीराम, मीना, लॅब टेक्निशियन रिझमा, वीरेश यांच्यासह नऊ जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिद्धेशसह अन्य फरार आरोपींना पकडण्यासाठी कारवाई सुरू आहे.

डॉ. सतीश याचा मोटीरीत मृतदेह

म्हैसूर येथील कोनसूर शासकीय रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर म्हणून कार्यरत काम करणारा डॉ. सतीश हा शुक्रवारी त्याच्या मोटारीमध्ये मृतावस्थेत आढळून आला. भ्रूणहत्या प्रकरणात त्याचे नाव आले होते. भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस येताच डॉ. सतीश हा फरार होता. पकडले जाण्याच्या भीतीने सतीशने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

दोन स्कॅनिंग मशिन जप्त

मंड्या जिल्ह्यातील अलेमाने येथे गर्भलिंग तपासणीसाठी वीरेशने स्कॅनिंग प्रयोगशाळा सुरू केली होती. त्यात डॉ. तुलसीराम आणि वीरेश अल्ट्रा साउंड स्कॅनिंग मशिन वापरून लिंगचाचणी करत होते. हा स्त्रीभ्रूण असल्याचे समजल्यानंतर गर्भवती महिलेला म्हैसूरचे डॉ. चंदन बल्लाळ यांच्या मालकीच्या आयुर्वेदिक डे केअर सेंटरमध्ये पाठवले जात होते. दरम्यान, दोन स्कॅनिंग मशिन जप्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT