Coal टिम ई सकाळ
देश

रशियामुळे भारत गोत्यात; कोळशाअभावी वीज निर्मिती धोक्यात

रशियावरील निर्बंधामुळे रशियातुन कोळसा आयात करणे भारतासाठी अधिक कठीण होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेनच्या युद्धाने संपुर्ण जगावर परीणाम पडलाय त्यात उद्योग क्षेत्राला मोठा तडाखा बसला. या युद्धादरम्यान रशियावर अनेक निर्बंध लादल्या गेले.या निर्बंधाचा परीणाम भारतावर होण्याची दाट शक्यता आहे. स्वीफ्ट बंदी आणि रशियावरील निर्बंधानंतर भारतीय खरेदीदार मागे हटले असून आता ते ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधून पर्याय शोधत असल्याचे कोलमिंटने सांगितले.

मार्चमध्ये भारताची रशियातून कोळशाची आयात दोन वर्षात सर्वाधिक असू शकते. रशिया कोकिंग आणि थर्मल कोळशाचा भारताचा सहावा सर्वात मोठा पुरवठादार आहे. इतर ग्राहकांनी निर्बंधांमुळे रशियाला नकार दिलाय त्यामुळे रशिया भारताला स्पर्धात्मक किमतीसुद्धा देऊ शकतो. यामुळे याचा परीणाम भारताच्या अंतर्गत व्यापाराला होणार आहे.

कोलमिंटच्या म्हणण्यानुसार २० मार्चपर्यंत सुमारे ८७००,००० टन रशियन कोळसा भारतीय किनार्‍यावर वितरित केला जाण्याची शक्यता आहे, हा एप्रिल २०२० नंतरचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून रशियन बंदरांवर अधिक कोळसा भरला गेल्याने ही संख्या जास्त असेल, कारण रशियन जहाजांना भारतात कोळसा पोहचविण्यासाठी साधारणतः एक महिना लागतो, असे कोलमिंटने सांगितले.

यातच स्वीफ्ट बंदी आणि रशियावरील निर्बंधानंतर भारतीय खरेदीदार मागे हटले आहेत तर आता ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधून ते पर्याय शोधत असल्याचे कोलमिंटने सांगितले. सीमापार पैशाचा व्यव्हार करणाऱ्या स्वीफ्ट सुरक्षित सिस्टीममधून अनेक रशियन बँका हटवल्या गेल्या आहेत.त्यामुळे त्याचा मोठा फटका रशिया भारत यांच्यातील कोळसा व्यापाराला होणार आहे.भारतीय खरेदीदार अजूनही रशियाकडून कोळसा पुरवठा करत आहे परंतु बँका क्रेडिट कार्ड्स उघडण्यास तयार नसल्याने भारतीय खरेदीदारांना ते अधिक कठीण वाटू लागले आहे.

रशियामधून आयात करणे अधिक कठीण होऊ शकते, असे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (JSPL) चे व्यवस्थापकीय संचालक व्ही आर शर्मा म्हणाले. जोपर्यंत "रुपया-रूबल" व्यापार होत नाही तोपर्यंत रशियामधून आयात करणे कठीण होईल, असेही ते म्हणाले.

यातच रशियासोबत रुपया पेमेंट यंत्रणा उभारण्याचे मार्ग शोधत आहे.जर रुपया-रूबल व्यापाराला मान्यता मिळाली, तर रशियाकडून स्वस्त दरात कोळसा मिळू शकेल. मात्र जर रशिया कडून कोळसा आयात करण्यात आला नाही तर याचा मोठा फटका भारतातील वीजनिर्मिला होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT