शाळा,कॉलेज आणि त्यानंतर नोकरी कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवास असाच होत असतो. मात्र नोकरी लागण्याआधीच कॉलजने पगारात हिस्सा माहितल्याचा प्रकार क्वचितच घडतो.सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की बंगळूरू येथील एका कॉलेजने त्यांच्या विद्यार्थ्यांकडे पगारातील ठराविक रक्कमेची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये एका विद्यार्थ्याने स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. या पोस्टनुसार कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कंपनीत निवड झाल्यानंतर बंगळूरुमधील कॉलेज त्यांच्या विद्यार्थअयाकडून सटीसीमधील हिस्सा देण्यासाठी दबाव आणतात, माझ्या कॉलेजने माझ्याकडे सीटीसीमधून २.१ टक्के हिस्सा मागितला आहे. याला प्लेसमेंट सेल फी असे म्हटले जाते, असेही सांगण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्ट इसकाळकडून कन्फर्म करण्यात आलेली नाहीये.
या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, या हिस्सा देण्याबद्दल विद्यार्थ्यांना आधी काहीच कल्पना देण्यात आली नव्हती आणि आता कॉलेजकडून त्या विद्यार्थ्याचे सर्व सर्टिफीकेट्स अडवून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीसोबतची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
या पोस्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, ही रक्कम देण्यासंबंधी कुठलेही परिपत्रक किंवा कागदपत्र सादर केले जाणार नाहीत आणि मौखिक स्वरुपातच पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मी अद्याप पैसे कमावणे सुरू देखील केलं नाहीये.
विद्यार्थ्याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, मी आत्ताच ग्रॅज्युएट झालो आहे, पण त्यांना मी सीटीसीपैकी २.१ टक्के रक्कम द्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील असं घडल्याचं मी ऐकल आहे, याबद्दल काही केलं जाऊ शकतं का? असंही तो विचारतो. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर अजून एका विद्यार्थ्याची अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.