श्रीनगर - एकीकडे संपूर्ण देश कोरोनाचा सामना करण्यासाठी एकटवलेला असताना काश्मीरमध्ये जवान दहशतवाद्यांचा मुकाबला करत आहेत. हंडवाडा भागात ओलीस ठेवलेल्या एका कुटुंबाला सोडवण्यासाठी दहशतवाद्यांशी केलेल्या चकमकीत शनिवारी कर्नल आणि मेजरसह पाच जवान हुतात्मा झाले. कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सुद, पोलीस उपनिरीक्षक शकील काझी अशी हुतात्मा अधिकाऱ्यांचे नाव आहेत. या वेळी दोन दहशतवादी ठार झाले.
उत्तर काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवाडा येथील चांगीमुल्ला भागात शनिवारी एका घरात दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. ते पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून येणाऱ्या एका दहशतवाद्यांच्या गटांना घेण्यासाठी आले होते. या वेळी दहशतवाद्यांनी घरातील काही नागरिकांना ओलिस ठेवले होते. त्यामुळे काल दुपारी तीनच्या सुमारास कर्नल आशुतोष शर्मा यांच्या नेतत्वाखाली सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिस यांचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. लष्कराने चांगीमुल्ला भागाला वेढा घातला होता. यादरम्यान हंडवाडातील इंटनरेट सेवा बंद करण्यात आली. या वेळी जवानांनी अडकलेल्या कुटुंबाला सहीसलामतपणे घराबाहेर काढले. यावेळी दहशथवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला आणि ते जंगलात पळून गेले. त्यानंतर चकमक थांबली. परत सायंकाळी पुन्हा चकमक सुरू झाली. या वेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, परंतु पाच जण हुतात्मा झाले. त्यानंतर या पाच जणांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या शोधार्थ लष्कराने तपास मोहिम सुरू केली असता पाच जण हुतात्मा झाल्याचे जाहीर करण्यात आले. या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज, लान्स नायक दिनेश , नायक राजेश आणि उपनिरीक्षक शकील काझी हे चकमकीत हुतात्मा झाले. कर्नल शर्मा हे २१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना काश्मीरमधील धाडसी कामगिरीबद्धल २०१९ मध्ये शौर्य पदकाने गौरविण्यात आले होते. कर्नल शर्मा यांचे पार्थिव उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे नेण्यात येणार असून मेजर सुद हे चंडीगडचे होत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हंडवाडा येथील कारवाईत जवानांनी दहशतवाद्याविरुद्ध अतुलनीय साहस दाखविले आहे. त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांचे हौतात्म्य आणि अगम्य साहस आपण कधीही विसरु शकत नाही. भारताच्या या महान सुपुत्रांच्या कुंटुंबीयांसमवेत देश उभा आहे.
राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.