Assembly Elections esakal
देश

Assembly Elections: मध्य प्रदेशात मतदानापूर्वी मोठा राडा, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी; पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा

मध्य प्रदेशात मतदानापूर्वी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोघांमधील वाद इतका वाढला की पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आणि अश्रुधुरांचा मारा करावा लागला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. याच्या काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री इंदूरच्या राऊळ विधानसभेत काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. वाद वाढत असल्याचे पाहून पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यासमोरून हटवण्यात आले.

वादाची माहिती मिळताच भाजपचे उमेदवार मधु वर्मा घटनास्थळी पोहोचले.त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने भंवर कुआँ पोलीस ठाण्यात पोहोचले. बराच वेळ झालेल्या वादानंतर पोलीस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ले देत होते. मात्र, ते एकमेकांवर आरोप करतच होते, या माहितीनंतर अतिरिक्त डीसीपीसह अनेक वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदानापूर्वी दोन्ही पक्षांचे सदस्य घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रचारात व्यस्त होते. त्यानंतर तेजाजी नगरजवळील जीत नगरमध्ये भाजपचे नगरसेवक पुष्पेंद्र चौहान आणि काँग्रेस उमेदवार जितू पटवारी यांच्या भावाचे समर्थक आमनेसामने आले.

यादरम्यान दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. माहिती मिळताच काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी भंवर कुआँ पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक तास बाचाबाची सुरूच होती. अशा स्थितीत पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.

माहिती मिळताच अतिरिक्त डीसीपी अभिनय विश्वकर्मा पोलीस ताफ्यासह भंवर कुआं पोलीस ठाण्यात पोहोचले. जिथे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जितू पटवारीचा भाऊ नाना पटवारी यांना पोलिस ठाण्यात बसविण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते परिसरात काही वस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप नाना पटवारी यांनी केला. काँग्रेसचे कार्यकर्ते जीत नगरमध्ये साहित्याचे वाटप करत असल्याचा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी केला, त्यामुळे हा गोंधळ झाला. पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राऊळमध्ये 3,55844 मतदार

इंदूर जिल्ह्यातील राऊळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जितू पटवारी दोनदा विजयी झाले आहेत. विधानसभेची जागा अस्तित्वात आल्यानंतर येथे तीनवेळा निवडणुका झाल्या असून, ही जागा भाजपच्या जितू जिराटी यांनी प्रथमच काबीज केली. त्यानंतर काँग्रेसचे जितू पटवारी सलग दोन वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी भाजपने राऊ मतदारसंघातून मधु वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने जितू पटवारीवर बाजी मारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump: विजयानंतर ट्रम्प यांना पहिला फोन मोदींचा; म्हणाले, माझ्या मित्रासोबत...

Elon Musk on Trump Victory: ट्रम्प यांच्या विजयावर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अपरिहार्य...

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT