नवी दिल्ली : देशात २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपविरोधात देशभरातील सर्वच विरोधीपक्ष एकवटले आहेत. पण पंतप्रधानपदचा चेहरा कोण असणार यावरुन मात्र त्यांच्यामध्येच गोंधळ पाहायला मिळतो आहे. यामध्ये आता डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नावाची भर पडली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं आहे. (Confusion over PM post among opposition MK Stalin name was taken by Farooq Abdulla)
अब्दुल्ला म्हणाले, भारतात विविधतेत एकता आहे. जर आपण याच विविधतेचं रक्षण केलं तर आम्ही याच एकतेचं रक्षण केलं. त्यासाठी मला वाटतं की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताला एकजूट करण्याचा प्रयत्न ही चांगली सुरुवात आहे. मला आशा आहे की, विरोधक अधिक मजबूत होती. इतर नेतेही त्याचप्रमाणं विचार करतील. आमच्याकडं एक चांगला देश आहे आम्ही याला पुढे घेऊन जाऊ.
विरोधीपक्षांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर अब्दुल्ला म्हणाले, जेव्हा आम्ही सर्वांची एकजूट होईल आणि जिंकू. त्यानंतर आम्ही ठरवू की, देशाचं नेतृत्व करणं आणि एकजुटीसाठी सर्वाधिक चांगली व्यक्ती कोण आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात का? यावर अब्दुल्ला म्हणाले, का नाही? ते पंतप्रधान का बनू शकत नाहीत? यामध्ये चुकीचं काय आहे? चेन्नईत द्रमुकच्या बैठकीत ते बोलत होते.
हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, सर्व समान विचारधारेच्या विरोधीपक्षांना विभाजनकारी शक्तींविरोधात एकसाथ यायला हवं. मी कधीही म्हटलं नाही की कोण पंतप्रधान होणार. आमच्यासाठी हा प्रश्नच नाही, फक्त आम्हाला एकजूट होऊन लढायचं आहे, हीच आमची इच्छा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.