Congress agitation Against BJP in Parliament Delhi 
देश

काँग्रेसचा संसदेत रुद्रावतार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी एबीने आज चौकशीसाठी बोलावले

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी एबीने आज चौकशीसाठी बोलावले असून हा मोदी सरकारच्या दडपशाहीचा नववा अवतार आहे, असा आरोप करीत काँग्रेसने आज संसदेपासून सडकेपर्यंत दिल्ली दणाणून सोडली.

संसदेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे सकाळ बरोबर बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांना खोट्या आरोपाखाली चौकशी करून त्रास देण्याचे मोदी सरकारचे कारस्थान नवे नाही. आता याचाहि अतिरेक होत असल्याने आता देशाची जनताच या सरकारला 2024 मध्ये सत्तेवरून खेचून निषेध करेल. महागाई आणि बेरोजगारी सारख्या समस्या आणि सामान्य जनता होरपळत आहे मात्र हे उप मध्ये संसदेत उपस्थित करण्यासही सरकार विरोधकांना परवानगी देत नाही ही लोकशाहीची थट्टा आहे असेही खरगे यांनी सांगितले.

दरम्यान आज सकाळी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक विरोधी पक्ष खासदारांनीही सरकारच्या दडपशाहीचा निषेध म्हणून याठिकाणी हजेरी लावली. दुपारी बाराच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार गांधी पुतळ्याजवळ एकत्र जमले. त्यांनी तेथून संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पदयात्रा काढली. तानाशाही नही चलेगी, सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर हे सर्वजण श्रीमती गांधी यांच्या निवासस्थानाकडे बसेस मधून रवाना झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT